ICC ODI world cup 2023 : आजपासून वन डे विश्वचषकाला सुरूवात होत आहे. सलामीचा सामना गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. आजच्या सामन्यासाठी किवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीच्या सामन्यातच गतविजेत्या इंग्लिश संघाला झटका बसल्याचे दिसते. कारण अष्टपैलू बेन स्टोक्स आजच्या सामन्याला मुकणार आहे.
दरम्यान, विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कार्यवाहक कर्णधार टॉम लॅथमने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात खेळत नाही. लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे बाहेर आहे.
आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ -टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट.
आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ -जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.