Join us  

ENG vs NZ Test : अरेरे काय झाले! न्यूझीलंडचे 6 फलंदाज 36 धावांवर तंबूत परतले

ENG vs NZ Test : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना आजपासून सुरू झाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्या मागे ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 6:41 PM

Open in App

ENG vs NZ Test : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना आजपासून सुरू झाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्या मागे लागलेले पीडा काही संपायचे नाव घेत नाही. कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. जेम्स अँडरसन या अनुभवी गोलंदाजांनी किवीचे कंबरडे मोडले, पण त्यात सरप्राईज पॅकेज ठरला पदार्पण वीर मॅथ्यू पॉट (  Matthew Potts )... लंच ब्रेक पर्यंत किवींनी 6 फलंदाज अवघ्या 36 धावांवर गमावलेले होते. 

जेम्स अँडरसनने पहिल्या पाच षटकांत दोन विकेट घेतल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकही धाव दिली नाही. IPL 2022 त पूर्णपणे अपयशी ठरलेला केन कसोटी तरी जलवा दाखवेल असं वाटले होते, परंतु पदार्पणवीर मॅथ्यूने त्याला अवघ्या दोन धावांवर माघारी पाठवले. मॅथ्यूने त्याच्या सुरुवातीच्या आठ षटकांत चार निर्धाव षटक फेकून 8 धावा देताना तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. 

इंग्लंडने सामन्यावर वर्चस्व गाजवले असले तरी त्यांचा एक महत्वाचा खेळाडू कनकशन नियमामुळे मैदान सोडावे लागले. जॅक लिचला ( Jack Leach ) क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. 

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
Open in App