कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ ( आयसीसी) अजून कोणत्याच अंतिम निर्णयावर आलेला नाही. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) आक्रमक पवित्रा घेताना इंडियन प्रीमिअर लीग( आयपीएल ) खेळवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत आयपीएल भारतात होणेही अवघड आहे. श्रीलंका आणि संयुक्त अऱब अमिराती यांनी आयपीएलच्या 13व्या मोसमाच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. पण, आता यात ट्विस्ट आलं आहे. आणखी एका देशानं आयपीएल आयोजनासाठी प्रस्ताव ठेवला आहे.
गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी 100 चिनी सैनिकांना केलं ठार?; माजी चिनी अधिकाऱ्याचा दावा
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 84,921 इतकी झाली आहे. त्यापैकी 5 लाख 37,362 रुग्ण दगावले असून 65 लाख 52,292 रुग्ण बरी झाली आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 7 लाखांच्या पार गेला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येत भारत तिसऱ्या स्थानावर आला आहे. अशा परिस्थितीत येथे आयपीएल होणं अवघड असल्याचे बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यांच्यासमोर श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती हे दोन पर्याय होते, परंतु त्यात आणखी एकाची भर पडली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्यास त्या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआयनं कंबर कसली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 25 सप्टेबंर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे.
माझी सगळी पदकं तुमची, तुमच्यापुढे मी कुणीच नाही; ऑलिम्पिकमधील 'गोल्डन गर्ल'चा डॉक्टरांना सलाम
''भारतात आयपीएल खेळवणे सद्यस्थितीत सुरक्षित नाही. संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांनी आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव ठेवला आहे. या संदर्भात सर्व स्टेकहोल्डर, ब्रॉडकास्टर आदींशी चर्चा केली जाईल. खेळाडूंची सुरक्षितता हे प्राधान्य आहे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.
आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचा फटका बसू शकतो. 2009मध्ये आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती, तर 2014मध्ये पहिले 20 सामने संयुक्त अरब अमिराती येथे झाले होते. श्रीलंका ही पहिली पसंती असली तरी न्यूझीलंडमध्ये कोरोना रुग्ण जवळपास संपल्यात जमा आहेत. पण, न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील वेळेत 7.30 तासांचा फरक आहे आणि त्यामुळे सामन्याच्या प्रक्षेपणात अडचण निर्माण होऊ शकते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भारतीय क्रिकेटपटूंना ओळखलंत का? अष्टपैलू खेळाडूनं शेअर केला पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!
पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी
बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार'
सचिन तेंडुलकर ओपनिंगला नॉन स्ट्राइकवर का रहायचा? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण
विनोद राय यांचा खुलासा; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड होता पहिली पसंती, पण...
WWE सुपरस्टारनं हद्दच केली; Romantic पोस्टसाठी पत्नीसोबत काढला विवस्त्र सेल्फी!