Martin Guptill, NZ vs IRE : भारत-इंग्लंड यांच्यातल्या वन डे मालिकेत धावा आटलेल्या पाहयला मिळत असल्या तरी न्यूझीलंडचे फलंदाज तुफान फॉर्मात दिसत आहेत. आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात तर किवी फलंदाजांनी ४० चौकार व ९ षटकारांची आतषबाजी करताना ४९ चेंडूंतच २१४ धावांचा पाऊस पाडला. मार्टिन गुप्तिलने ११५ धावांची खेळी करताना १५ चौकार व २ षटकार खेचले. हेन्री निकोल्सनेही ७९ धावांची वादळी खेळी करताना आयर्लंडसमोर ३६१ धावांचे तगडे लक्ष्य उभे केले.
मार्टिन गुप्तिल व फिन अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडताना किवींना चांगली सुरुवात करून दिली. फिन अॅलन २८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ३३ धावांवर माघारी परतला. विल यंग ( ३) लगेच माघारी परतला. पण, गुप्तिल व कर्णधार टॉम लॅथम यांनी गाडी रुळावर आणली. या दोघांनी ६० धावांची भागीदारी केली. लॅथम २६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर गुप्तिलची विकेट पडली. त्याने १२६ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांसह ११५ धावा चोपल्या.
यानंतर हेन्री निकोल्सने मोर्चा सांभाळला. त्याला ग्लेन फिलिप्स, मिचेल ब्रेसवेल व मिचेल सँटनर यांची साथ मिळाली. निकोल्सने ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावा केल्या. फिलिप्सने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. ब्रेसवेलनेही १६ चेंडूंत १ चौकार व १ षटकारासह नाबाद २१ धावा, तर सँटनरने १० चेंडूंत २ चौकारांसह नाबाद १४ धावा केल्या. न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ३६० धावा चोपल्या.
Web Title: New Zealand post 360/4 against Ireland in the 3rd ODI. A fantastic 115 runs by Martin Guptill and a brilliant 79 from Henry Nicholls takes them to the score.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.