न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केला. हा पराभव म्हणजे टी-२० मालिकेतील ०-५ अशा पराभवाचे उट्टे फेडण्याचा प्रकार आहे. त्यात पहिल्या दोन सामन्यांत तर कर्णधार आणि मुख्य फलंदाज केन विल्यम्सनदेखील नव्हता. भारताचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यानंतर नमूद केले की, यावर्षी एकदिवसीय सामन्यांना प्राधान्य नव्हते. यावर्षी आॅक्टोबरमध्ये टी-२० वर्ल्ड चॅम्पियनशिपबरोबर एप्रिल २०२१ मध्ये कसोटी वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल असल्यामुळे हे मतदेखील योग्य आहे.या विजयाने न्यूझीलंडचे मनोबल उंचावले आहे. त्यासह आता यजमान संघ कसोटी मालिकेत प्रवेश करेल, तर भारताचे काय चुकले याबाबत चिंता सुरू आहे.एकदिवसीय मालिकेतकाय चुकले?यासाठी फक्त एक गोष्ट कारणीभूत नाही तर काही बाबी अपेक्षेनुसार घडल्या नाहीत. गेल्या वर्षभरात चांगल्या फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. त्याच्या आधी धवन जखमी झाला; त्यामुळे भारताचे नियमित सलामीवीर उपलब्ध नव्हते. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांना रोहित आणि शिखरसारखा खेळ करता आला नाही.जखमी खेळाडूच्या जागेवर खेळणाºया खेळाडूला आपले कौशल्य दाखवण्याची संधी असते मात्र हे या दोन्ही सलामीवीरांनी निराशा केली. राहुल आणि अय्यर यांनी चांगली खेळी केली. मनिष पांडेनेही चमकदार कामगिरी केली.छोट्या मैदानावर आणि सपाट खेळपट्ट्यांवर भारताची धावांची गती कमी होती आणि गोलंदाजीवर नियंत्रणदेखील नव्हते. ठाकूर आणि सैनी हे टी-२० सामन्यांएवढे सक्षम नव्हते. जडेजा स्थिर होता, पण तो बळी घेऊ शकला नाही. कुलदीपने गडी बाद केले; पण चहल जास्त चांगला ठरला.शमीला विश्रांती दिल्याने बुमराहवरील ताण वाढला; त्यामुळे भारताचा हा मुख्य गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला; त्यामुळे किवी संघाला जास्त उत्तेजन मिळाले.एकदिवसीय सामन्याच्या स्वरूपात भारताच्या दोन सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची आकडेवारी पाहिल्यास एक रोमांचक कथा समोर येईल. विराटने तीन सामन्यांत फक्त ७५ धावा केल्या, तर बुमराहला तीन सामन्यांत एकही गडी बाद करता आला. भारताने ही मालिका ०-३ अशी गमावली.- अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत
- Cricket Buzz»
- बातम्या»
- न्यूझीलंडकडून ‘क्लीन स्वीप’ची परतफेड
न्यूझीलंडकडून ‘क्लीन स्वीप’ची परतफेड
न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 4:37 AM