New Zealand squad for the T20I vs India : श्रीलंकेनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. न्यूझीलंडचा संघ भारत (IND vs NZ) दौऱ्यावर येणार. या दौऱ्यावर न्यूझीलंडला प्रथम तीन सामन्यांची वन डे मालिका खेळावी लागणार आहे आणि त्यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी ( India vs New Zealand) आपला संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि तेथे कसोटीनंतर वन डे मालिका सुरू आहे. वन डे मालिकेतील तोच संघ काही बदलासह भारतात येणार आहे. त्यात न्यूझीलंडने ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी नव्या खेळाडूकडे सोपवली आहे, ज्याने नेतृत्वकौशल्याचे धडे MS Dhoni कडून गिरवले आहेत.
भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडने जाहीर केलेल्या संघात केन विल्यमसन आणि टीम साऊदी यांची नावे नाही. कारण या संघात बहुतांश युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर संघाचे नेतृत्व मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेनंतर २७ जानेवारीपासून ट्वेंटी-२० मालिका सुरू होणार आहे. ऑकलंड एसेसकडून खेळणारा डावखुरा फिरकीपटू बेन लिस्टर आणि कँटरबरी किंग्जच्या हेन्री शिपली यांचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. लिस्टरने गेल्या वर्षी भारतात 'न्यूझीलंड अ' संघातून पदार्पण केले होते. मात्र, न्यूमोनियाचा त्रास झाल्याने त्यांना हा दौरा अर्धवट सोडून परतावे लागले.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या मिचेल सँटनरकडे ट्वेंटी-२० कर्णधारपद सोपवले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे सिलेक्टर गार्विन लार्सन म्हणाले, "मिचेलने याआधी कर्णधारपद भूषवले आहे आणि तो भारतात खूप क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याचा अनुभव संघाला उपयोगी पडेल. त्यामुळेच आम्ही त्याला आमचा कर्णधार म्हणून निवडले आहे."
न्यूझीलंडचा ट्वेंटी-२० संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपन, ब्लेअर टिकनर, हेन्री शिपले, ईश सोढी
न्यूझीलंडचा वन डे संघ:केन विल्यमसन (कर्णधार, फक्त पाकिस्तान मालिका), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅप्मन (केवळ भारत), डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी (फक्त भारत), लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (कर्णधार भारताविरुद्ध), अॅडम मिल्ने, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, ईश सोधी, टिम साउथी (फक्त पाकिस्तान)
भारत-न्यूझीलंड
पहिली वन डे - १८ जानेवारी, हैदराबाद
दुसरी वन डे - २१ जानेवारी, रायपूर
तिसरी वन डे - २४ जानेवारी, इंदूर
पहिली ट्वेंटी-२० - २७ जानेवारी, रांची
दुसरी ट्वेंटी-२० - २९ जानेवारी, लखनौ
तिसरी ट्वेंटी-२० - १ फेब्रुवारी, अहमदाबाद
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: New Zealand squad for the T20I vs India : Mitchell Santner to lead against India, left-arm swing bowler Ben Lister earns maiden BLACKCAPS call-up
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.