T20 World Cup : न्यूझीलंडने जाहीर केला वर्ल्ड कपसाठीचा संघ; १४ वर्षांत पहिल्यांदा दिग्गज खेळाडू ICC स्पर्धेला मुकणार! 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. प्रत्येक संघ वर्ल्ड कपच्या तयारीला लागले आहेत आणि अंतिम संघ निवडण्यापूर्वी खेळाडूंच्या फॉर्मची चाचपणी करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 11:09 AM2021-08-10T11:09:01+5:302021-08-10T11:09:44+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand squads have been confirmed for the T20 World Cup, Ross Taylor, Colin de Grandhomme miss out | T20 World Cup : न्यूझीलंडने जाहीर केला वर्ल्ड कपसाठीचा संघ; १४ वर्षांत पहिल्यांदा दिग्गज खेळाडू ICC स्पर्धेला मुकणार! 

T20 World Cup : न्यूझीलंडने जाहीर केला वर्ल्ड कपसाठीचा संघ; १४ वर्षांत पहिल्यांदा दिग्गज खेळाडू ICC स्पर्धेला मुकणार! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. प्रत्येक संघ वर्ल्ड कपच्या तयारीला लागले आहेत आणि अंतिम संघ निवडण्यापूर्वी खेळाडूंच्या फॉर्मची चाचपणी करत आहेत. पण, अशात न्यूझीलंड संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. १७ ऑक्टोबरपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि कोरोना परिस्थितीमुळे ही स्पर्धा भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडनं जाहीर केलेल्या संघात सर्वात अनुभवी खेळाडू रॉस टेलर याचे नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. २००७नंतर प्रथमच टेलर आयसीसीच्या स्पर्धेत किवी संघाचा सदस्य नसेल. त्याच्यासोबत कॉलीन डी ग्रँडहोम व टॉम लॅथम यांचेही नाव नाही. आक्रमक फटकेबाजीमुळे ट्वेंटी-२०त नाव कमावणाऱ्या फिन अॅलन यालाही संघात जागा पटकावण्यात अपयश आलं. BLACKCAPS SQUAD ANNOUNCEMENTS for T20 World Cup! 

यूएईत होणाऱ्या स्पर्धेसाठी किवींनी मिचेल सँटनर, इश सोढी आणि टॉम एस्टल या तीन फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे. ट्रेंट बोल्ट, कायले जेमिन्सन, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊदी यांच्यावर जलद गोलंदाजीची जबाबदारी असेल. त्यांच्या व्यतिरिक्त जिमी निशॅम व मार्क चॅपमॅन या अष्टपैलू खेळाडूंनाही निवडले आहे. अॅडम मिल्ने हा राखीव गोलंदाज असेल, तर टीम सेईफर्ट यष्टिंमागे दिसेल. हाच संघ वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी येईल.


ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान व बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यांसाठीही संघानं टीम जाहीर केली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सहभाग घेणारे खेळाडू या दौऱ्यावर राष्ट्रीय संघाचे सदस्य नसतील. न्यूझीलंडचा पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱा हा आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्या दरम्यानच येत आहे. त्यामुळे टॉम लॅथम याच्या नेतृत्वाखाली या दौऱ्यांसाठी दुसऱ्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी निवडलेला संघ -  केन विलियम्सन ( कर्णधार), मार्टिन गुप्तील, डेव्हन कॉनव्हे, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, टीम सेईफर्ट, मिचेल सँटनर, ईश सोढी, ग्लेन फिलिप्स, जिमी निशॅम, डेरिल मिचेल, कायले जेमिन्सन, लॉकी फर्ग्युसन, मार्क चॅपमॅन, टॉम एस्टल. राखीव खेळाडू - अॅडम मिल्ने  

Web Title: New Zealand squads have been confirmed for the T20 World Cup, Ross Taylor, Colin de Grandhomme miss out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.