वेलिंग्टन : हेन्री निकोल्स याच्या शतकाच्या मदतीने न्यूझीलंडने बेसिन रिझर्व्हच्या कठीण पीचवर वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी शुक्रवारी सहा गडी बाद २९४ धावा केल्या आहेत. निकोल्स याने आपले सहावे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने ११७ धावा केल्या. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते. धावा करण्यात अडचणी येत होत्या.तसेच सलगच्या पावसाने अनेक दिवस खेळपट्टीवर कव्हर देखील टाकलेले होते. त्यामुळे येथे नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करणे खूपच कठीण होते हे स्पष्टच होते. त्यासोबतच वेगवान वाऱ्यांनी आणखी अडथळे निर्माण केले होते. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि शॅनन गॅब्रिएल याने वेगवान वाऱ्यांचा पुरेपुर फायदा घेतला. उपहारापर्यंत न्यूझीलंडचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.
त्यानंतर निकोल्सला आपल्या खेळीत तीन जीवदान मिळाले. त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आणि १४ कसोटी डावांमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. गॅब्रिएलने त्याला पहिल्यांदा जीवदान दिले तेव्हा तो ४७ धावांवर होता. त्याच धावांवर चेमार होल्डरने त्याचा दुसरा झेल सोडला. त्यानंतर चहापानानंतर कर्णधार होल्डरने दुसऱ्या स्लिपमध्ये विल यंग याचा शानदार झेल घेतला. गॅब्रिएल याचा हा १५० वा बळी होता. गॅब्रिएल याने टॉम ब्लंडेल आणि टेलरला बाद केले होते. होल्डरने लॅथमला बाद केले. निकोल्सने यंगसोबत ७० आणि बी.जे. वॉटलींग सोबत ८३ धावांची भागीदारी केली.
Web Title: New Zealand strengthened by Nichols' century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.