आता T20 विश्वचषक 2021 च्या अंतिम सामन्याला अवघे काही तासच शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia Vs New zealand) यांच्यातील या महा सामन्यावर कोट्यवधी चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. हा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संयंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. (New zealand Vs Australia t20 world cup final)
अंतिम सामन्यापूर्वी भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झाम्पाचे कौतुक केले आहे. तेंडुलकर म्हणाला, झाम्पा फलंदाजाची हालचाल पाहून चेंडू सोडतो. यावरून गोलंदाज फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येते.
सचिन तेंडुलकरने फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, 'झम्पाच्या गोलंदाजीमध्ये मी एक गोष्ट पाहिली आहे. जेव्हा फलंदाज बाहेर येतो, तेव्हा त्याचा रिलीज पॉइंट नंतर असतो. जर तुम्ही चेंडू बरोबर डोक्याच्या वर सोडला तर, साधारणपणे त्याची लेंगथ चांगली असते. जेव्हा हात थोडा डोक्यावर जातो आणि तेव्हा तुम्ही बॉल सोडता, म्हणजेच रिलीझ पॉइंट नंतर असेल, तर बहुतेक बॉल शॉर्ट-पिच असतात.'
तेंडुलकर म्हणाला, 'यामुळे तो बॉल उशिरा तेव्हाच सोडत होता, जेव्हा फलंजाड बाहेर येत होता. तुम्ही पाहिले असेल की, अनेक वेळा फलंदाज क्रीझमधून बाहेर आले, पण प्रत्यक्षात चेंडू त्यांच्या हिटिंग रेंजमध्ये नव्हता. चेंडू थोडा दूर राहत होता? गोलंदाज हा बदल तेव्हाच करू शकतो जेव्हा तो चांगल्या फॉर्ममध्ये असतो.'
अॅडम झाम्पा सहा सामन्यांत 12 विकेट्स घेत, या स्पर्धेतील सर्वाधिक बळी मिळवणारा दुसरा गोलंदाज आहे. तो केवळ श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाच्या मागे आहे, हसरंगाने आठ सामन्यांत 16 बळी मिळवले आहेत. झाम्पाने सुपर 12 टप्प्यात बांगलादेशविरुद्ध 19 धावा देत पाच विकेट घेतल्या होत्या. त्याची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी होती.