Join us

१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा

हा सामना  इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटसाठी खास आहे. कारण तो १५० कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतल्याचे पाहायला मिळाले. पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 10:21 IST

Open in App

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्च येथील हॅगले ओव्हल मैदानात खेळवण्यात येत आहे. हा सामना  इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटसाठी खास आहे. कारण तो १५० कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतल्याचे पाहायला मिळाले. पण या सामन्यात त्याच्या पदरी भोपळा आल्याने त्याच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झालीये. १५० व्या कसोटी सामन्यात जो रुटला नवोदीत नॅथन स्मिथनं तंबूचा रस्ता दाखवला. ४ चेंडू खेळून खाते न उघडता माघारी फिरण्याची वेळ त्याच्यावर आली.

WTC मध्ये विराट अन् स्मिथपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा

कसोटी कारकिर्दीत १३ व्या वेळी तो शून्यावर बाद झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) आठव्यांदा तो खाते उघडण्यात अयपशी ठरला. यात त्याने किंग कोहलीसह स्टीव्ह स्मिथ या दोघांना मागे टाकले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत मुल्तानमध्ये द्विशतकी खेळी केल्यानंतर मागील पाच डावात रुटच्या भात्यातून फक्त ९० धावा आल्या आहेत. 

१५० व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारा तिसरा फलंदाज ठरला रुट

कसोटी कारकिर्दीत मैलाचा टप्पा पार केल्यावर या सामन्यात अवस्मणी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. कसोटीच्या इतिहासात १५० व्या सामन्यात शून्यावर बाद होणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग यांच्यावर अशी नामुष्की ओढावली होती. 

१५० व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारे फलंदाज

स्टीव्ह वॉ (AUS vs PAK, शारजाह, २००२) - पहिला चेंडूरिकी पाँटिंग (AUS vs ENG, ॲडलेड, २०१०) - पहिला चेंडूजो रूट (ENG वि NZ, क्राइस्टचर्च, २०२४) - चौथा चेंडू

हॅरी ब्रूकच शतक

क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना यजमान न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ३४८ धावा केल्या आहेत. केन विलियम्सन याने केलेल्या ९३ धावांच्या खेळीशिवाय ग्लेन फिलिप्सनं नाबाद ५८ धावांची खेळी केली.  इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात एकदम खराब झाली. झॅक क्राउली १२ चेंडूचा सामना करुन खातेही न उघडता तंबूत परतला.  बेन डकेट याने ४६ धावा केल्या. जेकॉबनं १० धावा करून तंबूचा रस्ता धरला. जो रूटही शून्यावर बाद झाल्यामुळे इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला. पण हॅरी ब्रूक आणि ओली पोप यांनी १५१ धावांच्या  भागीदारीसह संघाचा डाव सावरला आहे. ओली पोप ७७ धावांवर बाद झाला. दुसरीकडे हॅरी ब्रुक्सनं शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :जो रूटन्यूझीलंडइंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहली