न्यूझीलंड विरुद्ध चौथा वन डे आज; भारताचा ‘क्लीन स्वीप’चा निर्धार

रोहितचा २०० वा सामना अविस्मरणीय ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:35 AM2019-01-31T06:35:42+5:302019-01-31T06:36:13+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand vs Fourth day today; Determination of India's 'Clean Sweep' | न्यूझीलंड विरुद्ध चौथा वन डे आज; भारताचा ‘क्लीन स्वीप’चा निर्धार

न्यूझीलंड विरुद्ध चौथा वन डे आज; भारताचा ‘क्लीन स्वीप’चा निर्धार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हॅमिल्टन : ओळीने तीन सामने जिंकून मालिका आधीच खिशात घालणाऱ्या भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीप करण्याचा इरादा कायम आहे. याच निर्धाराने आज गुरुवारी चौथ्या सामन्यात भारत खेळणार असून दुहेरी शतक ठोकण्यात पटाईत मानला जाणारा रोहित शर्मा हा स्वत:चा २०० वा सामना अविस्मरणीय ठरवेल का, याकडे देखील चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

वन डे क्रिकेटमध्ये रोहितने तीनवेळा द्विशतके ठोकली आहेत. सेडन पार्कची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. अशावेळी फॉर्ममध्ये असलेल्या पाहुण्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान यजमान गोलंदाजांपुढे असेल. भारताने ४-० ने आघाडी मिळविल्यास ५२ वर्षांत न्यूझीलंडमध्ये हा सर्वांत मोठा विजय ठरेल. भारताने सर्वांत आधी १९६७ मध्ये या देशाचा दौरा केला होता.

दोन सामन्यात भारताला राखीव खेळाडूंना अजमावण्याची संधी असून मागच्या सामन्यात जायबंदी झालेला महेंद्रसिंग धोनी सामना खेळेल, असे संकेत मिळाले आहेत. विराटने मात्र उर्वरित सामन्यातून विश्रांती घेतली आहे. शुभमन गिलच्या स्ट्रोक्समध्ये विराटसारखी ताकद दिसत असल्याचे जाणकारांचे मत असल्याने त्याला सिनियर संघात खेळण्याची संधी मिळू शकते. गिल आणि धोनी खेळल्यास दिनेश कार्तिक याला बाहेर बसावे लागेल.

गोलंदाजीत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी चांगली कामगिरी केली. दोनदा सामनावीर ठरलेल्या मोहम्मद श्मी याला देखील विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तो आॅस्ट्रेलिया मालिकेपासून सलग सामने खेळत आहे. शमी बाहेर बसल्यास मोहम्मद सिराज आणि खलील मोहम्मद यांच्यापैकी एकजण खेळेल.

न्यूझीलंडसाठी ही मालिका प्रत्येक बाबतीत निराशादायी ठरली. फलंदाज भारतीय फिरकीपुढे शरणागती पत्करत आहेत. विलियम्सन चांगली सुरुवात करतो पण त्याच्याकडून मोठी खेळी होऊ शकली नाही. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट याला दुसºया टोकाहून साथ मिळताना दिसत नाही. वेगवान डग ब्रेसवेल आणि फिरकीपटू ईश सोढी हे देखील प्रभाव टाकण्यात अपयशी ठरले आहेत. (वृत्तसंस्था)

उभय संघ यातून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या.

न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), रोस टेलर, टाम लाथम, मार्टिन गुप्तिल, कोलिन ग्रॅन्डहोम, ट्रेंट बोल्ट, हेन्री निकोल्स, टॉड अ‍ॅस्टल, लोकी फग्युर्सन, मॅट हेन्री, कोलिन मुन्रो, जिम्मी नीशाम, मिशेल सेंटनर आणि टिम साउदी.

Web Title: New Zealand vs Fourth day today; Determination of India's 'Clean Sweep'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.