भारत विरुद्ध न्यूझीलंड : यजमान न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जसप्रीत बुमराहला विकेटचे खाते उघडता आले असले तरी किवींच्या तळाच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. पदार्पणवीर कायले जेमिसनने गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही कमाल दाखवली. त्याला कॉलीन डी ग्रॅंडहोम आणि ट्रेंट बोल्ट यांची तुल्यबळ साथ मिळाली. भारताच्या १६५ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करताना १८३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. जेमिसनने ४४ धावा चोपल्या आणि त्यात ४ षटकारांचा समावेश होता. ग्रॅंडहोम आणि बोल्ट यांनी अनुक्रमे ४३ आणि ३८ धावा केल्या.
LIVE UPDATES -
- अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीनं सावध खेळ करताना टीम इंडियाचा आजचा पराभव उद्यावर ढकलला आहे. भारताने दिवसअखेर ४ बाद १४४ धावा केल्या आहेत. रहाणे २५ आणि विहारी १५ धावांवर नाबाद आहेत.
-अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी सावध खेळ करताना टीम इंडियाच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत.
विराट कोहलीची ११वी धाव ठरली पराक्रमी; मोडला सौरव गांगुलीचा विक्रम
- विराट कोहलीही ( १९) धावा करून माघारी परतला. ट्रेंट बोल्टनं त्याला बाद केले
-दुसऱ्या डावात टीम इंडियाला ८व्या षटकात पहिला धक्का बसला. पृथ्वी शॉ ( १४) ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारानं दुसऱ्या विकेटसाठी मयांकसह अर्धशतकी भागीदारी केली. चहापानापूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर पुजारा (११) बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. मयांक चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु साऊदीच्या चेंडूवर छेडण्याचा नाद त्याला भोवला. मयांक ५८ धावा करून माघारी परतला.
- चहापानापर्यंत टीम इंडियाला दोन धक्के
- दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. त्यानं चेतेश्वर पुजाराला (११) बाद करत मयांकसोबतची ५१ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.
- मयांकने अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाच्या डावाला मजबूती दिली
- मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी संयमी खेळ करताना संघाला अर्धशतकी पल्ला ओलांडून दिला.
टीम इंडियाला विजयासाठी करावा लागेल पाकिस्तानसारखा करिष्मा
- कायले जेमिसनची ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकेल क्लार्कच्या विक्रमाशी बरोबरी
- सलामीवीर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टनं 8व्या षटकात पृथ्वीला ( 14) बाद केले.