भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : भारतीय संघाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात दारूण पराभव पत्करावा लागला. यजमान न्यूझीलंड संघानं दहा विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केलं आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावातही दोनशे धावांचा पल्ला ओलांडला आला नाही. भारताचा दुसरा डाव 191 धावांवर गडगडला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी माफक 9 धावांचे लक्ष्य आले. यजमानांनी दहा चेंडूंत हा सामना जिंकला. या विजयासह न्यूझीलंड संघानं मानाच्या पंक्तीत स्थान पटकावलं. आतापर्यंत केवळ सहाच संघांना असा मान मिळवता आला आहे.
न्यूझीलंडचा भारतावर १० गडी राखून विजय; मालिकेत आघाडी
पराभवानंतर विराट म्हणतो; नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरला, अन्...
न्यूझीलंडनं काल पहिल्या डावात 348 धावा केल्या. त्यामुळे त्यांच्याकडे 183 धावांची भक्कम आघाडी होती. यानंतर भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. मयांक अगरवालनं अर्धशतक झळकावलं. मात्र कर्णधार विराट कोहलीसह भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी नाबाद होते. यावेळी भारताच्या 4 बाद 144 धावा झाल्या होत्या. भारतीय संघ त्यावेळी 39 धावांनी मागे होता आणि चौथ्या दिवशी टीम इंडियाला केवळ 47 धावा करता आल्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच अवघ्या 79 मिनिटांमध्ये भारताचे सहा फलंदाज तंबूत परतले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीनं 5, तर ट्रेंट बोल्टनं 4 गडी बाद केले.
न्यूझीलंडचा हा शंभरावा कसोटी विजय ठरला. 1930 ते 2020 या कालावधीत त्यांनी 441 कसोटींपैकी 100 कसोटी जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. त्यांना 175 सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर 166 सामने अनिर्णीत राहिले. ऑस्ट्रेलियाने सर्वात कमी म्हणजेच 199 सामन्यांत शंभर विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. त्यानंतर इंग्लंड ( 241), वेस्ट इंडिज ( 266), दक्षिण आफ्रिका ( 310), पाकिस्तान ( 320) आणि भारत ( 432) या संघांनी सर्वात कमी सामन्यांमध्ये शंभर कसोटी जिंकले आहेत.
- ऑस्ट्रेलिया 1877-2020 - 830 सामने, 393 विजय, 224 पराभव, 2 बरोबरीत, 211 ्निर्णीत
- इंग्लंड 1877-2020 - 1022 सामने, 371 विजय, 304 पराभव, 347 अनिर्णीत
- वेस्ट इंडिज 1928-2019 - 545 सामने, 174 विजय, 195 पराभव, 1 बरोबरीत, 175 अनिर्णीत
- दक्षिण आफ्रिका 1889-2020 - 439 सामने, 165 विजय, 150 पराभव, 124 अनिर्णीत
- भारत 1932-2020 - 541 सामने, 157 विजय, 166 पराभव, 1 बरोबरीत, 217 अनिर्णीत
- पाकिस्तान 1952-2020 - 428 सामने, 138 विजय, 130 पराभव, 160 अनिर्णीत
- न्यूझीलंड 1930-2020 - 441 सामने, 100 विजय, 175 पराभव, 166 अनिर्णीत