न्यूझीलंड संघानं दुसऱ्या वन डे सामन्यात 22 धावांनी विजय मिळवून भारताविरुद्धची तीन सामन्यांची मालिका खिशात घातली. ट्वेंटी-20 मालिकेत दारूण पराभव पत्करणाऱ्या न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दमदार कमबॅक केले. पहिल्या सामन्यातील विजयाची परंपरा दुसऱ्या सामन्यातही कायम राखून त्यांनी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आघाडीच्या फलंदाजांनी पत्करलेली शरणागती अन् रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी दिलेली झुंज अपयशी ठरल्यानं भारताला पराभव पत्करावा लागला. पण, कर्णधार कोहलीनं या पराभवानंतर अजबच उत्तर दिलं. त्याचं हे उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
रवींद्र जडेजाची फटकेबाजी; कपिल देव अन् धोनीचाही मोडला विक्रम
मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांच्या दमदार ( 93 धावा) सलामीनंतरही किवींच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. रॉस टेलरनं पुन्हा एकदा अखेरच्या षटकांत उपयुक्त खेळी करत जोरदार पलटवार केला. त्यानं पदार्पणवीर कायले जॅमिसनला सोबत घेताना नवव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडनं 8 बाद 273 धावा केल्या. जॅमिसन 24 चेंडूंत 25 धावांवर ( 1 चौकार व 2 षटकार) नाबाद राहिला. रॉसनं 74 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 73 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी ढेपाळली. पृथ्वी शॉ ( 24), मयांक अग्रवाल ( 3), विराट कोहली ( 15), लोकेश राहुल ( 4) आणि केदार जाधव ( 9) यांना माघारी पाठवून न्यूझीलंडनं विजयाचा पाया रचला होता. पण, श्रेयस अय्यरनं फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळी केली. त्यानं 57 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 52 धावा केल्या. पण, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर चुकीचा फटक मारून तोही माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी आठव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करताना सामन्यातील चुरस कायम राखली होती. कायले जेमीसननं ही जोडी संपुष्टात आणली. सैनीनं 49 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 45 धावा केल्या. जडेजानं 73 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचून 55 धावा केल्या.
सामन्यानंतर कोहली म्हणाला,''हे दोन सामने चाहत्यांसाठी पर्वणी देणारे ठरले. आजच्या सामन्यात पहिल्या सत्रात आम्ही विकेट फेकल्या. नवदीप सैनी आणि रवींद्र जडेजानं दमदार खेळ केला. यंदाच्या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेट हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. आमचे लक्ष्य कसोटी व ट्वेंटी-20 क्रिकेटवर आहे.''
न्यूझीलंडवर अशी वेळ का आली? क्षेत्ररक्षक प्रशिक्षकालाच मैदानावर फिल्डींग करावी लागली
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अंपायरवर भडकला, पण का?
जसप्रीत बुमराहला नेमकं झालंय तरी काय? आजच्या सामन्यात नोंदवला नकोसा विक्रम
टीम इंडियाचे कमबॅक; पण, न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा जबरदस्त पलटवार
Web Title: New Zealand vs India, 2nd ODI : In this calendar year ODI is not as relevant like T20Is and Tests, say virat kohli after match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.