Join us  

NZ vs IND, 2nd ODI : लढलो, पण हरलो! जडेजा-सैनीच्या खेळीनं मात्र मनं जिंकली

सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे धुरंधर सहज पार करतील, असा आत्मविश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 3:32 PM

Open in App

सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे धुरंधर सहज पार करतील, असा आत्मविश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण, सामना सुरू झाला अन् अवघ्या 20 षटकातं चेहऱ्यावरील त्या आत्मविश्वासाचे निराशेत रुपांतर झाले. भारताचे आघाडीचे पाच फलंदाज 96 धावांवर माघारी परतले. श्रेयस अय्यर ( 52) आणि रवींद्र जडेजा यांनी आशेचा किरण जागवला. पण, तोही किवी गोलंदाजांच्या वेगवान वाऱ्यासमोर टिकू शकला नाही. मात्र, चमत्कार घडावा तसा नवदीप सैनी टीम इंडियासाठी धावून आला. जडेजा व नवदीप सैनीनं आठव्या विकेटसाठी दमदार भागीदारी करताना टीम इंडियाला अश्यक्यप्राय विजय मिळवून दिलाच होता. पण, किवींनी हा सामना जिंकून वन डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

रॉस टेलरनं पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करताना भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. दमदार सुरुवातीनंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीनं शरणागती पत्करली. 1 बाद 142 वरून न्यूझीलंडची अवस्था 7 बाद 187 अशी दयनीय झाली होती. पण, त्यानंतर रॉस टेलर खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्यानं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांच्या दमदार ( 93 धावा) सलामीनंतरही किवींच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. रॉस टेलरनं पुन्हा एकदा अखेरच्या षटकांत उपयुक्त खेळी करत जोरदार पलटवार केला. त्यानं पदार्पणवीर कायले जॅमिसनला सोबत घेताना नवव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडनं 8 बाद 273 धावा केल्या. जॅमिसन 24 चेंडूंत 25 धावांवर ( 1 चौकार व 2 षटकार) नाबाद राहिला. रॉसनं 74 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 73 धावा केल्या.  

लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉनं दमदार सुरुवात केली, परंतु मयांक अग्रवाल पुन्हा अपयशी ठरला. हॅमिश बेन्नेटनं त्याला तिसऱ्या षटकात स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरकरवी झेलबाद केले. मयांक 3 धावांवर माघारी परतला. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कायले जेमिसन यानं भारताला दुसरा धक्का दिला. त्याच्या अप्रतिम चेंडूवर पृथ्वी शॉच्या यष्टिंचा वेध घेतला. भरताला 34 धावांवर दोन धक्के बसले. टीम साउदीनं त्याच्या भात्यातला आतापर्यंचा अप्रतिम चेंडू टाकून विराट कोहलीचाही त्रिफळा उडवला. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज 57 धावांत माघारी परतले. भारताची ही पडझड इथेच थांबली नाही. कॉलीन डी ग्रँडहोमच्या चेंडूवर कट शॉट मारण्याच्या नादात लोकेश राहुल त्रिफळाचीत झाला. 

केदार जाधवला आज मोठी खेळी करून स्वतःचे स्थान आणखी पक्क करण्याची संधी होती. पण, त्यानंही निराश केले. तो अवघ्या 9 धावा करून माघारी परतला. श्रेयस अय्यरनं फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळी केली. त्यानं 57 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 52 धावा केल्या. पण, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर चुकीचा फटक मारून तोही माघारी परतला. शार्दूल ठाकूरनं फटकेबाजी करून भारतीय चाहत्यांचे मनोरंजन केले, परंतु ग्रँडहोमच्या अप्रतिम चेंडूंन त्याचा त्रिफळा उडवला. जडेजा आणि नवदीप सैनी यांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. या जोडीनं आठव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. कायले जेमीसननं ही जोडी संपुष्टात आणली. सैनीनं 49 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 45 धावा केल्या. 

जडेजानं सामन्याची सर्व सूत्र हाती घेताना अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 67 चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. समजुतदारीनं खेळून सामना तोंडाशी आणण्यात हातभार लावणाऱ्या युजवेंद्र चहलनं घाई केली. चहल 12 चेंडूंत 10 धावा करून माघारी परतला. त्यानंतर जडेजाही बाद झाला. त्यानं 73 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचून 55 धावा केल्या.  भारताचा संपूर्ण संघ 251 धावांत माघारी परतला.

न्यूझीलंडवर अशी वेळ का आली? क्षेत्ररक्षक प्रशिक्षकालाच मैदानावर फिल्डींग करावी लागली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अंपायरवर भडकला, पण का?

जसप्रीत बुमराहला नेमकं झालंय तरी काय? आजच्या सामन्यात नोंदवला नकोसा विक्रम

टीम इंडियाचे कमबॅक; पण, न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा जबरदस्त पलटवार

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरवींद्र जडेजारॉस टेलर