Join us  

NZvIND, 3rd ODI : विराट कोहली विश्रांती घेणार, टीम इंडिया बदलासह मैदानावर उतरणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड संघानं पहिले दोन सामने जिंकून ही मालिका आधीच खिशात घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 1:15 PM

Open in App

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड संघानं पहिले दोन सामने जिंकून ही मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना यजमानांसाठी औपचारीक आहे, तर टीम इंडियाला इभ्रत वाचवण्यासाठी विजय मिळवणे अनिवार्य आहे. पण, यंदाच्या वर्षात वन डे क्रिकेट हे लक्ष्य नसल्याचे कोहलीनं आधीच स्पष्ट केलं आहे. यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आहे आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 आणि कसोटीवर लक्ष केंद्रीत करण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात टीम इंडिया काही प्रयोग करू शकते. आगामी कसोटी मालिकेचे महत्त्व लक्षात घेता कर्णधार विराट कोहली विश्रांती घेऊ शकतो.

तिसऱ्या वन डेसाठी न्यूझीलंड संघात दोन बदल; प्रमुख खेळाडूची वापसी

न्यूझीलंडनं पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य चार विकेट्स राखून पार केले. रॉस टेलरच्या शतकी खेळीनं किवींना मालिकेत आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यातही रॉस टेरलची बॅट तळपली. त्याला मार्टीन गुप्तीलचीही साथ लाभली. न्यूझीलंडच्या 273 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 251 धावांवर गडगडला. किवींनी 22 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडिया काही युवा चेहऱ्यांना संधी देऊ शकते.

पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रावल यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्यानं पृथ्वी व मयांक यांना संधी मिळाली. पण, या दोघांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. तरीही तिसऱ्या सामन्यात हे दोघेही खेळतील, परंतु सलामीला मयांकच्या जागी लोकेश राहुल येऊ शकतो. मयांकला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळण्याची  शक्यता आहे. कर्णधार विराट कोहली या सामन्यात विश्रांती घेऊ शकतो. आगामी कसोटी मालिका डोळ्यासमोर ठेवून कोहलीनं विश्रांती घेणं महत्त्वाचे आहे. पण, संघात कुणीच अनुभवी खेळाडू नसल्यानं कोहलीच्या विश्रांतीवर संभ्रम आहे.

श्रेयस चांगल्या फॉर्मात आहे आणि तो त्याचे स्थान कायम राखेल. राहुलला बढती मिळाल्यानंतर पाचव्या स्थानी मनीष पांडेला संधी मिळेल. रिषभ पंतही यष्टिंमागे दिसू शकतो. त्याच्यासाठी केदार जाधवला विश्रांती मिळू शकते. केदारला फलंदाजीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दोन्ही वन डेत त्याला गोलंदाजीचीही संधी मिळालेली नाही. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा कायम राहिल. पहिल्या सामन्यात महागडा ठरलेला शार्दूल ठाकूर दुसऱ्या सामन्यात यशस्वी ठरला होता. त्यामुळे त्याचे स्थान कायम राहिल. युजवेंद्र चहल, नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराह ही त्याच्या मदतीला असतील.

अंतिम अकरा - पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, विराट कोहली/मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत/ केदार जाधव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी

बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला

न्यूझीलंडच्या महिला फलंदाजाचा विक्रम; पुरुष क्रिकेटपटूला जमला नाही 'हा' पराक्रम

ध्रुव जुरेलची महेंद्रसिंग धोनी स्टाईल 'स्टम्पिंग'; नेटिझन्सकडून कौतुक

विजयाच्या उन्मादात बांगलादेशच्या खेळाडूंकडून टीम इंडियाच्या खेळाडूंना धक्काबुक्की, Video

अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, टीम इंडियाचे न्यूझीलंडला चोख प्रत्युत्तर 

World Cup बाबत आयसीसीचा मोठा निर्णय; भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला फटका? 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीलोकेश राहुलपृथ्वी शॉमयांक अग्रवालकेदार जाधवरिषभ पंतजसप्रित बुमराहयुजवेंद्र चहलशार्दुल ठाकूर