रोहित नाईक मुंबई : अनुभवी रॉस टेलर (९५) आणि टॉम लॅथम (१०३*) यांनी केलेल्या निर्णाय द्विशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बलाढ्य भारतीय संघाचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. विशेष म्हणजे २०० वा एकदिवसीय सामना खेळणाºया विराट कोहलीने शानदार शतक झळकावून कॅप्टन इनिंग खेळल्यानंतरही भारताला पराभवास सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद २८० धावा काढल्यानंतर न्यूझीलंडने आवश्यक धावा ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ४९ षटकांत पार केल्या. यासह किवी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, कोहलीचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरल्याने भारताची धावसंख्या मर्यादित राहिली. धावांचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुन्रो यांनी न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करून दिली. परंतु, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे गुप्टिल (३२), मुन्रो (२८) व कर्णधार केन विल्यम्सन (६) यांना झटपट बाद केल्याने न्यूझीलंडचा डाव बिनबाद ४८ वरून ३ बाद ८० असा घसरला. या वेळी भारत पुनरागमन करेल, अशी आशा होती.परंतु, टेलर - लॅथम यांनी चौथ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा विजय साकारला. टेलरने १०० चेंडूंत ८ चौकारांसह ९५ धावा केल्या, तर लॅथमने १०२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०३ धावांचा विजयी तडाखा दिला. विजयासाठी केवळ एका धावेची आवश्यकता असताना टेलर बाद झाला. यानंतर हेन्री निकोल्सने चौकार मारत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्का मारला. विशेष म्हणजे पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाल्यानंतर दुसºया सराव सामन्यात टेलर - लॅथम यांनी वैयक्तिक शतक ठोकताना न्यूझीलंडला विजयी केले होते. त्याच खेळीची पुनरावृत्ती या दोघांनी वानखेडे स्टेडियमवर केली.तत्पूर्वी, कोहलीने कारकिदीर्तील विक्रमी ३१ वे शतक झळकावताना भारताला आव्हानात्मक मजल मारून दिली. कोहलीने १२५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १२१ धावांची शानदार खेळी केली. चौथ्या षटकात बोल्टने भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने प्रथम धवन (९) आणि त्यानंतर रोहितला (२०) बाद करून भारताची ५.४ षटकांत २ बाद २९ अशी अवस्था केली. यानंतर, कोहली व केदार जाधव यांनी भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अत्यंत सावध पवित्रा घेतल्याने सलामी जोडी परतल्यानंतर पुढील ५ षटकांत भारताने केवळ ८ धावा काढल्या. त्यात वैयक्तिक २९ धावांवर खेळत असलेल्या कोहलीला कॉलिन डी ग्रँडेहोमच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले.एका बाजूने कोहली खंबीरपणे किल्ला लढवत असताना दुसºया टोकाकडून केदार जाधव (१२), दिनेश कार्तिक (३७), महेंद्रसिंह धोनी (२५) आणि हार्दिक पांड्या (१६) अपयशी ठरले. कोहली - कार्तिक यांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करून भरताची पडझड रोखली. अखेरच्या काही षटकांत भुवनेश्वर कुमारने १५ चेंडंूत २ चौकार व २ षटकारांसह २६ धावा चोपल्यामुळे भारताला आव्हानात्मक मजल मारता आली. न्यूझीलंडसाठी बोल्ट (४/३५) आणि टीम साऊदी (३/७३) यांनी अचूक मारा केला....आणि खेळ थांबलान्यूझीलंड संघ फलंदाजी करत असताना चौथ्या षटकात वानखेडे स्टेडियममधील एक विद्युत प्रकाशझोत बंद राहिल्याने काही मिनिटांसाठी खेळ थांबविण्यात आला.‘बॉलबॉय’ने घेतला कोहलीचा झेल...पहिल्या डावातील २५ व्या षटकात विराट कोहलीने अॅडम मिल्नेच्या गोलंदाजीवर लाँगलेगला षटकार ठोकला. या वेळी, सीमारेषेवर असलेला बॉलबॉय आयुष झिमरे याने एका हाताने अप्रतिम झेल घेत सर्वांचे लक्ष वेधले.>धावफलकभारत : रोहित शर्मा त्रि. गो. बोल्ट २०, शिखर धवन झे. लॅथम गो. बोल्ट ९, विराट कोहली झे. बोल्ट गो. साऊदी १२१, केदार जाधव झे. व गो. सँटेनर १२, दिनेश कार्तिक झे. मुन्रो गो. साऊदी ३७, महेंद्रसिंह धोनी झे. गुप्टिल गो. बोल्ट २५, हार्दिक पांड्या झे. विल्यम्सन गो. बोल्ट १६, भुवनेश्वर कुमार झे. निकोल्स गो. साऊदी २६, कुलदीप यादव नाबाद ०. अवांतर - १४. एकूण : ५० षटकांत ८ बाद २८० धावा.गोलंदाजी : टीम साऊदी १०-०-७३-३, ट्रेंट बोल्ट १०-१-३५-४; अॅडम मिल्ने ९-०-६२-०; मिशेल सँटेनर १०-०-४१-१; कॉलिन डी ग्रँडेहोम ४-०-२७-०; कॉलिन मुन्रो ७-०-३८-०.न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. कार्तिक गो. हार्दिक ३२, कॉलिन मुन्रो झे. कार्तिक गो. बुमराह २८, केन विल्यम्सन झे. जाधव गो. कुलदीप ६, रॉस टेलर झे. चहल गो. भुवनेश्वर ९५, टॉम लॅथम नाबाद १०३, हेन्री निकोल्स नाबाद ४. अवांतर - १६. एकूण : ४९ षटकांत ४ बाद २८४ धावा.गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-५६-१; जसप्रीत बुमराह ९-०-५६-१; कुलदीप यादव १०-०-६४-१; हार्दिक पांड्या १०-०-४६-१; यजुवेंद्र चहल १०-०-५१-०.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- न्यूझीलंडने उडवला विजयाचा बार, रॉस टेलर - टॉम लॅथम यांनी केला भारताचा पराभव
न्यूझीलंडने उडवला विजयाचा बार, रॉस टेलर - टॉम लॅथम यांनी केला भारताचा पराभव
अनुभवी रॉस टेलर (९५) आणि टॉम लॅथम (१०३*) यांनी केलेल्या निर्णाय द्विशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बलाढ्य भारतीय संघाचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 3:59 AM