हॅमिल्टन : जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी भेदक गोलंदाजीचा दमदार सराव करीत न्यूझीलंड एकादशला दुसऱ्या दिवशी ७४.२ षटकांत २३५ धावांत रोखले. वेलिंग्टन येथे २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीआधी फलंदाजांनीदेखील धावा काढून सूचक संकेत दिले आहेत.
बुमराहने ११ षटकात १८ धावात २, शमीने १० षटकात १७ धावात ३, उमेश यादवने १३ षटकात ४९ धावात २ आणि नवदीप सैनी याने १५ षटकात ५८ धावा देत २ गडी बाद केले. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी आता सोपी होत आहे. पृथ्वी शॉ याने १९ चेंडूत नाबाद २९ आणि मयांक अग्रवाल याने १७ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. दुसºया दिवशी खेळ संपला त्यावेळी भारताने बिनबाद ५३ अशी मजल गाठली होती. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वेगवान गोलंदाजांची लय पडताळण्यासाठी बुमराह आणि शमी यांना अधिक षटके टाकण्याची संधी बहाल केली. ढगाळ वातावरणात दोघांनीही टिच्चून मारा केला. उमेश आणि सैनी यांनी पहिल्या स्पेलमध्ये काही धावा मोजल्या. त्याचवेळी बुमराहने विल यंग (२) आणि फिन अॅलन (२०) यांना बाद केले.
उपाहारानंतर शमीने दुसºया स्पेलमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांना त्रस्त केले. आंतरराष्टÑीय खेळाडू जिमी निशाम हा शमीच्या उसळी घेणाºया चेंडूंचा सामना करताना घाबरलेला दिसत होता. शमीने खेळपट्टीवर स्थिरावलेला हेन्री कूपर (६८ चेंडूत ४० धावा) याला बाद केले. यानंतर बुमराह आणि शमी यांनी गोलंदाजी केली नाही. खेळाच्या अखेरच्या अर्ध्या तासात भारताचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी स्कॉट कुगेलिजन आणि ब्लेयर टिकनर यांचा मारा सहजपणे खेळून धावा काढल्या. भारताने दुसºया दिवशीही शॉ आणि अग्रवाल यांना सलामीला संधी दिल्यामुळे शुभमान गिल याला कसोटी पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असे संकेत मिळत आहेत.संक्षिप्त धावफलकभारत पहिला डाव : २६३ धावा. न्यूझीलंड एकादश पहिला डाव : ७४.२ षटकात सर्वबाद २३५ धावा (सचिन रवींद्र ३४, फिन अॅलन २०, हेन्री कूपर ४०, टॉम ब्रूस ३१, डेरिल मिशेल ३२, ईश सोढी १४ अवांतर २८). गोलंदाजी : बुमराह २/१८, उमेश यादव २/४९, शमी ३/१७, नवदीप सैनी २/५८, अश्विन १/४६.भारत दुसरा डाव : ७ षटकांत बिनबाद ५९ (पृथ्वी शॉ नाबाद ३५, मयांक अग्रवाल नाबाद २३).