मॅन्चेस्टर : आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य लढतीत टीम इंडिया मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळेल, तर यजमान इंग्लंडची लढत गुरुवारी होणाºया दुसºया उपांत्य लढतीत गत चॅम्पियन आॅस्ट्रेलियाविरुद्ध होईल. साखळी फेरीतील ४५ सामने आॅस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान झालेल्या लढतीने संपले.
आॅस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांना शनिवारी अखेरच्या साखळी सामन्यापूर्वीच आपण उपांत्य फेरी गाठली आहे, याची कल्पना आली होती. भारताने हेडिंग्लेमध्ये श्रीलंकेविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवला आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने साखळी फेरीचा समारोप विजयाने करताना गुणतालिकेत आॅस्ट्रेलियाला पिछाडीवर सोडले. दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या साखळी लढतीत आॅस्ट्रेलियाचा १० धावांनी पराभव केला.
भारताचा विजय आणि आॅस्ट्रेलियाचा पराभव यामुळे २०११ चा विजेता संघ साखळी फेरीअखेर अव्वल स्थानी राहिला. त्यामुळे भारताला ओल्ड ट्रॅफोर्डवर चौथ्या स्थानावरील संघाच्या आव्हानाला समोरे जावे लागणार आहे. चौथ्या स्थानी न्यूझीलंड संघ आहे.ही रंगतदार लढत होईल. कारण उभय संघ या विश्वकप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळले नाहीत.ट्रेंटब्रिजमध्ये १३ जून रोजी उभय संघांदरम्यानच्या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. भारताला साखळी फेरीत एकमेव पराभव इंग्लंडविरुद्ध पत्करावा लागला. त्यामुळे ९ सामन्यांत भारताच्या खात्यावर १५ गुणांची नोंद राहील. याउलट या विश्वकप स्पर्धेत चांगली सुरुवात केल्यानंतर न्यूझीलंडने पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध तीन सामने गमावले. ९ सामन्यांत त्यांच्या खात्यावर ११ गुणांची नोंद आहे. रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने साखळी फेरीत ६४७ धावा केल्या, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ४८१ धावा केल्या आहेत.
अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत झाल्यामुळे आॅस्ट्रेलियाची दुसºया स्थानी घसरण झाली. आता उपांत्य फेरीत त्यांच्यापुढे यजमान इंग्लंडचे आव्हान राहील. अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील संघाने जूनच्या शेवटी लॉडर्््समध्ये इंग्लंड विरुद्ध ६४ धावांनी विजय मिळवला होता. कर्णधार अॅरोन फिंच (५०७) व डेव्हिड वॉर्नर (६३८) यांनी आॅस्ट्रेलियातर्फे फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे; तर जो रुट (५००) आणि बेयरस्टो (४६२) हे इंग्लंडतर्फे धावा करण्यात अव्वल आहेत.