Join us  

बलाढय इंग्लंडपुढे न्यूझीलंडचे आव्हान; टी-२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज रंगणार

सलामीचा जेसन रॉय जखमी होऊन बाहेर पडला. रॉय - बटलर या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 8:52 AM

Open in App

अबुधाबी : जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला पण जखमी खेळाडूंच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या इंग्लंडपुढे बुधवारी (दि. १०) टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दमदार न्यूझीलंडचे कडवे आव्हान असेल.  विशिष्ट खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर बलाढ्य कामगिरी केल्यानंतर द. आफ्रिकेविरुद्ध अखेरचा साखळी सामना गमावल्यामुळे इयोन मोर्गनच्या नेतृत्वाखालील संघ अपराजित नाही, हे स्पष्ट झाले आहे. अबुधाबीची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते.

सलामीचा जेसन रॉय जखमी होऊन बाहेर पडला. रॉय - बटलर या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. आता बटलरच्या सोबतीला जॉनी बेयरेस्टो असेल. बटलर, बेयरेस्टो आणि मोईन अली हे स्वबळावर सामना फिरवू शकतात. रॉयच्या जागी सॅम बिलिंग्सला मधली फळी भक्कम करण्यासाठी संधी दिली जाईल. या संघाची जमेची बाब अशी की, अनेक फलंदाजांनी धावा काढल्या. वेगवान गोलंदाज टायमल मिल्सच्या जांघेत दुखापत झाल्याने तो देखील संघाबाहेर आहे. मिल्स डेथ ओव्हरमध्ये उपयुक्त ठरतो.

मार्क वूडकडे वेग आहे, पण मिल्ससारखी विविधता नाही. द. आफ्रिकेविरुद्ध तो सर्वांत महागडा ठरला. अशावेळी फिरकीपटू मोईन अली आणि आदिल राशिद यांची भूमिका मोलाची ठरणार आहे. पॉवर प्ले आणि मधल्या षटकात न्यूझीलंडवर दडपण आणण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. दोन्ही संघ १९९९च्या वन-डे विश्वचषक फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते. सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर अधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंडने त्यावेळी विश्वचषक उंचावला होता. न्यूझीलंडसाठी तो हृदयद्रावक पराभव होता. त्यानंतरही त्यांनी आयसीसी स्पर्धेत सातत्य दाखवून डब्ल्यूटीसी चषक जिंकला. न्यूझीलंडकडे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत. भारताला त्यांनी ११० धावांत रोखले होते.

इंग्लंडविरुद्ध ‘कमाल’ करू : बोल्ट

‘इंग्लंड संघात अनेक मॅचविनर आहेत. संतुलित असलेल्या या संघाने मर्यादित षटकांचे अनेक सामने खेळले आहेत. आमचाही संत सामना फिरविण्यात पटाईत असल्याने उपांत्य लढतीत कमाल करू. पाकविरुद्ध पराभवानंतर आमचे खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करीत आहेत.’ 

टॅग्स :विश्वचषक ट्वेन्टी-२०इंग्लंडन्यूझीलंड
Open in App