रांची : सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून पाहुण्या किवी संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रांची येथील JSCA स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी स्वतः पत्नी साक्षीसोबत स्टेडियममध्ये पोहोचला होता. या सामन्यादरम्यान मोठ्या स्क्रीनवर धोनीला दाखवण्यात आले, त्यानंतर स्टेडियम धोनी-धोनीच्या घोषणांनी दुमदुमले.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भलेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ अद्याप तशीच आहे. पहिला ट्वेंटी-20 सामना पाहण्यासाठी रांचीमधील स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. त्याचे एकमेव कारण म्हणजे महेंद्रसिंग धोनी. याबाबत न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशमला धोनीच्या चाहत्यांविषयी विचारले असता त्याने आश्चर्यकारक विधान केले.
जिमी नीशमने धोनीबद्दल मोठे वक्तव्यस्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये बोलताना जिमी नीशम म्हणाला, "ही खूप छान भावना आहे. तुम्हाला असे वाटते की तुमच्यावर लक्ष ठेवले जात आहे. पण तुमची फलंदाजी किंवा गोलंदाजी पाहण्यासाठी प्रत्यक्षात तिथे कोणीच नव्हते. प्रत्येकजण दुसर्याला पाहण्यासाठी तिथे उपस्थित होते. कारण स्टेडियममध्ये प्रेक्षक आम्हाला पाहायला आले नाहीत, तर ते धोनीला पाहायला आले आहेत. रांची हे धोनीचे होम ग्राउंड आहे आणि जेव्हाही येथे सामना होतो तेव्हा धोनी निश्चितपणे सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचतो."
न्यूझीलंडची 1-0 ने आघाडीभारतीय संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारतीय संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावाच करू शकला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर (50) आणि सूर्यकुमार यादव (47) यांनी सर्वाधिक धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"