न्यूझीलंडचा आज सराव सामना, श्रेयस अय्यरकडे नेतृत्व : अध्यक्षीय संघात राहुलचा समावेश

भारताविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघ मंगळवारी बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या लढतीच्या निमित्ताने न्यूझीलंडला येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची व फिरकी मा-याविरुद्ध खेळण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:49 AM2017-10-17T01:49:15+5:302017-10-17T01:49:28+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand's practice match today, Shreyas Iyer lead: Rahul's inclusion in presidential squad | न्यूझीलंडचा आज सराव सामना, श्रेयस अय्यरकडे नेतृत्व : अध्यक्षीय संघात राहुलचा समावेश

न्यूझीलंडचा आज सराव सामना, श्रेयस अय्यरकडे नेतृत्व : अध्यक्षीय संघात राहुलचा समावेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघ मंगळवारी बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या लढतीच्या निमित्ताने न्यूझीलंडला येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची व फिरकी मा-याविरुद्ध खेळण्याची सराव करण्याची संधी मिळाली आहे.
केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या मैदानावर काही सत्र सराव केला. मंगळवारी याच मैदानावर सामना होणार आहे.
विलियम्सन, रॉस टेलर आणि मार्टिन गुप्तील मालिकेपूर्वी फॉर्मात येण्यासाठी उत्सुक आहेत. दुसºया बाजूचा विचार करता बोर्ड अध्यक्ष इलेव्हन युवा आहे. या संघाचे नेतृत्व मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर करणार आहे. त्याने भारत ‘अ’ संघातर्फे चांगली कामगिरी केली आहे. अय्यर, करुण नायर, यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि युवा पृथ्वी शॉ निवड समितीचे लक्ष वेधण्यास प्रयत्नशील आहेत. गोलंदाजही किवी फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी सज्ज आहेत.
दरम्यान, फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर टॉम लॅथम व गुप्तील संघाला चांगली सुरुवात करून देतील, अशी न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेंसन यांना आशा आहे.
बोर्ड अध्यक्ष इलेव्हन संघात एकही सिनिअर गोलंदाज नाही. त्यामुळे धवल कुलकर्णी व जयदेव उनाडकट नव्या चेंडूची जबाबदारी सांभाळतील. फिरकीची बाजू शाहबाज नदीम व युवा दीपक चहार यांच्यावर राहील.
विलियम्सन म्हणाला, ‘भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दोन सराव सामने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्हाला येथील वातावरणासोबत जुळवून घेता येईल.’
फिरकीपटूंना अनुकूल भारतीय खेळपट्ट्यांवर न्यूझीलंडची दारोमदार मिशेल सँटनरवर राहील. येथे १० दिवसांपासून पाऊस सुरू असून त्याचा प्रभाव खेळावर होण्याची शक्यता आहे. पावसामुळे बाह्य मैदान निसरडे झाले आहे.
 

प्रतिस्पर्धी संघ
न्यूझीलंड :- केन विलियम्सन (कर्णधार), टास अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, कोलिन डे ग्रांडहोम, मार्टिन गुप्तील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अ‍ॅडम मिल्ने, कोलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम साऊदी, रॉस टेलर, जॉर्ज वर्कर. बोर्ड अध्यक्ष इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिवम चौधरी, करुण नायर, गुरकिरत मान, मिलिंद कुमार, रिषभ पंत, शाहबाज नदीम, दीपक चहार, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, अवेश खान.

Web Title: New Zealand's practice match today, Shreyas Iyer lead: Rahul's inclusion in presidential squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.