New Zealand's T20 World Cup squad: आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार संपताच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. यासाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला असून, पुन्हा एकदा केन विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघ मोठ्या व्यासपीठावर खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंडने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. खरं तर विल्यमसन सहाव्यांदा विश्वचषक खेळणार आहे. (T20 World Cup News)
न्यूझीलंडने पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने संघ जाहीर केला. यापूर्वी वन डे विश्वचषकासाठी आपल्या संघाची घोषणा करताना क्रिकेटपटूंची मुले, पत्नी आणि प्रेयसी दिसल्या होत्या. आता ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर करतानाही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक नवीन प्रयोग केला. यावेळी Matilda आणि Angus या दोन मुलांनी संघ जाहीर केला.
विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ -केन विल्यमसन (कर्णधार), फिन ॲलन, ट्रेन्ट बोल्ट, मायकेल ब्रेसव्हेल, मार्क चॅपमन, डेव्होन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी, डेरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल ,सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी.
न्यूझीलंडची नवीन जर्सी
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट -
- अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
- ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
- क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
- ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ