PAK vs AUS | नवी दिल्ली : वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत निवड समिती बरखास्त केली. त्यात बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. मागील काही दिवसांत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर नवनिर्वाचित निवडकर्ता वहाब रियाजने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी शान मसूदच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाची घोषणा झाली आहे.
शान मसूद पहिल्यांदाच पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करत असून त्याच्यासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. बाबरच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तानच्या कसोटी संघाची धुरा मसूदच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघात हारिस रौफला जागा मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
- दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
- तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
Web Title: newly Chief selector Wahab Riaz announces 18-member pakistan squad for the three-match Test series against Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.