Asia Cup 2022 : भारताला आणखी एक धक्का, रवींद्र जडेजानंतर जलदगती गोलंदाजाची स्पर्धेतून माघार

Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेतील आव्हान टीकवण्याचा भारताचा संघर्ष सुरू असताना मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:13 PM2022-09-06T21:13:34+5:302022-09-06T21:14:27+5:30

whatsapp join usJoin us
NEWS ALERT: Avesh Khan has been ruled out of Asia Cup 2022; Deepak Chahar replaces him in India's squad | Asia Cup 2022 : भारताला आणखी एक धक्का, रवींद्र जडेजानंतर जलदगती गोलंदाजाची स्पर्धेतून माघार

Asia Cup 2022 : भारताला आणखी एक धक्का, रवींद्र जडेजानंतर जलदगती गोलंदाजाची स्पर्धेतून माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेतील आव्हान टीकवण्याचा भारताचा संघर्ष सुरू असताना मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजा याच्यापाठोपाठ जलदगती गोलंदाज आवेश खान ( Avesh Khan) यानेही आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. सुपर ४ च्या सामन्यापूर्वी आवेशची तब्येत बिघडल्याचे राहुल द्रविड यांनी सांगितले होते. त्यामुळेच तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या जागी संघात दीपक चहर याची एन्ट्री झाली आहे. Deepak Chahar चा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला होता आणि आता मुख्य संघात आला आहे. आवेशची स्पर्धेतील कामगिरी फार चांगली झालेली नाही. त्याने दोन सामन्यांत ७२ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. 

दरम्यान, श्रीलंकेची स्पर्धेतील सुरुवात खराब झाली असली तरी त्यांनी जबरदस्त कमबॅक केलेले पाहायला मिळतेय. त्यांनी पहिल्या तीन षटकांत लोकेश राहुल व विराट कोहली यांची विकेट घेताना भारताची अवस्था २ बाद १२ अशी केली आहे. पण, कर्णधार रोहित  शर्मा ( Rohit Sharma) सामन्याची सूत्र हाती घेताना श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ३२वे अर्धशतक पूर्ण करताना विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने सूर्यकुमार यादवसह तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडताना अनेक विक्रम केला. चमिका करुणारत्नेने ही महत्त्वाची विकेट घेतली. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला.
 

Web Title: NEWS ALERT: Avesh Khan has been ruled out of Asia Cup 2022; Deepak Chahar replaces him in India's squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.