IPL 2023, MI vs KKR : मुंबई इंडियन्सने आज घरच्या मैदानावर कोलकात नाइट रायडर्सवर ५ विकेट्स व १४ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या मुंबईने KKRला ६ बाद १८५ धावांवर रोखले. KKRच्या वेंकटेश अय्यरने १०४ धावांची खेळी करून एकाकी खिंड लढवली. प्रत्युत्तरात, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी दमदार फटकेबाजी केली. रोहित शर्माही चांगला खेळला. टीम डेव्हिडने मॅच फिनिशरची भूमिका बजावली. हा सामना चर्चेत राहिला तो KKRचा कर्णधार नितीश राणा आणि MIचा गोलंदाज हृतिक शोकीन यांच्या भांडणामुळे
नितीशला ५ धावांवर बाद केल्यानंतर शोकीन काहीतरी बोलला आणि दिल्लीचे हे खेळाडू एकमेकांना भिडले. नितीशने अत्यंत घाणेरडी शिवी घातली. सूर्यकुमार यादव व पीयुष चावला यांनी मध्यस्थी करताना नितीशला पेव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले. या दोघांच्या या गैरवर्तवणुकीवर बीसीसीआयने कारवाई केली. नितीशच्या मॅच फीमधून २५ टक्के, तर शोकीनच्या मॅच फीमधून १० टक्के रक्कम दंड म्हणून भरावा लागणार आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवलाही षटकांची गती संथ ठेवल्यामुळे १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
Web Title: NEWS ALERT: Suryakumar Yadav has been fined INR 12 lakh for slow over-rate and Nitish Rana (25% of match fee), and Hrithik Shokeen (10% of match fee) were fined for breaching the IPL Code of Conduct.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.