Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वेअपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. या हृदयद्रावक घटनेनं अनेकांचं संसार मोडलं, काहींच्या पोटचा लेक तर कुणाचा 'बाप' हिरावला. अंगावर काटा आणणाऱ्या या दृश्यांनी सर्वांनाच संभ्रमात टाकलं. हा अपघात म्हणजे एक वाईट स्वप्न म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आजही यावर विश्वास ठेवणं कठीणच... खरं तर या अपघातानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. तेथील स्थानिक युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून माणुसकी दाखवली.
या अपघातानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने देखील मृतांना श्रद्धांजली वाहिली. अशातच विराटने अपघातग्रस्तांसाठी पैसे दान केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पण यात किती सत्य आहे? खरंच विराट कोहलीने ओडिशातील अपघाग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत केली का? आणि केली तर किती? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विराटने ओडिशातील रेल्वे अपघातामुळे ग्रस्त झालेल्यांना ३० कोटी दान केले, अशी बातमी व्हायरल होत आहे. पण ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. कारण विराटने अधिकृतपणे अशी कोणतीही घोषणा केली नाही अथवा माहिती दिली नाही. असेच काहीसे महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत व्हायरल झाले होते. धोनीने महिला पैलवानांच्या आंदोलनाला समर्थन दिले असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. ओडिशा रेल्वे अपघातात २८८ जण दगावलेअवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २८८ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.