Join us

विराटची तक्रार केल्याचे वृत्त धादांत खोटे -अश्विन

संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी विराटच्या नेतृत्वात आपला छळ होत असल्याची तक्रार बीसीसीआयकडे केल्याचे वृत्त नुकतेस प्रसिद्ध करण्यात आले होते.’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 10:40 IST

Open in App
ठळक मुद्देवरिष्ठ खेळाडूंनी विराटच्या नेतृत्वात आपला छळ होत असल्याची तक्रार बीसीसीआयकडे केल्याचे वृत्त नुकतेस प्रसिद्ध करण्यात आले होते.’

दुबई : भारतीय कसोटी संघातील वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणे यांनी बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडे विराट कोहलीची तक्रार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. आता या यादीत रविचंद्रन अश्विनचेही नाव जोडले जात आहे. याबाबत अश्विनने स्वत:च एक खुलासा केलाय. आपण अशी कोणतीही तक्रार बीसीसीआयकडे केली नसल्याचे अश्विन म्हणाला.

इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत अश्विनने हे स्पष्टीकरण दिले आहे. तो पुढे म्हणाला, ‘हे वृत्त हास्यास्पद आहे. खोट्या बातम्या पसरविण्याचा हा प्रकार आहे. मी तर त्या पेजच्या शोधात आहे की ज्याने ही खोटी बातमी पसरविली.

संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी विराटच्या नेतृत्वात आपला छळ होत असल्याची तक्रार बीसीसीआयकडे केल्याचे वृत्त नुकतेस प्रसिद्ध करण्यात आले होते.’

टॅग्स :आर अश्विनविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App