भारतीय संघाने शनिवारी T-20 विश्वचषक जिंकला आणि 17 वर्षांचा दुष्काळ संपला. संपूर्ण देशभरात या विजयाचा आनंदोत्सव साजरा होत असताना आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच किंग कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. ही बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती.
ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? सूर्यकुमारनं सांगितलं - कोहली आणि रोहित या दोहोंच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय घढलं यासंदर्भात सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे. त्यांना निवृत्तीपासून रोखण्याचा आणि आणखी एक विश्वचषक खेळण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी ऐकले नाही, असे सूर्यकुमार म्हणाला, तो आज तकसोबत बोलत होता. कोहलीला आपल्या आखेरच्या टी-20 इंटरनॅशनलमध्ये सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले तर रोहितने कर्णधार म्हणून विजयासह निवृत्तीची घोषणा केली.
काय म्हणाला सूर्यकुमार? -सूर्यकुमार म्हणाला, "अशा मोमेंटला खेळ सोडणे अत्यंत कठीण असते. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रसंगी निवृत्ती घेणे, चांगले आहे. ते जेव्हा डगआऊट, ड्रेसिंग रूममध्ये बसले होते, तेव्हा आम्ही म्हणत होतो, 'काही हरकत नाही, अजून दीड वर्ष आहे, दोन वर्षांनी विश्वचषक भारतात आहे, हे सर्व बोलू नका. पुढच्या वर्षी बघू. मात्र, कदाचित दोघांनीही आधीच सर्व काही ठरवलं होतं. यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही, असे मला वाटते."