India vs Australia, 2nd Test : चुकला तरी सांभाळून घेतो तो खरा कर्णधार; अजिंक्य रहाणेनं पुन्हा मनं जिंकली!

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane) फटकेबाजी पाहण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून टिव्हीसमोर बसलेल्यांची निराशा झाली.

By स्वदेश घाणेकर | Published: December 28, 2020 06:43 AM2020-12-28T06:43:32+5:302020-12-28T07:49:12+5:30

whatsapp join usJoin us
Nice gesture from Ajinkya Rahane, he was encouraging Ravindra Jadeja after the mistake which lead to runout of the captain | India vs Australia, 2nd Test : चुकला तरी सांभाळून घेतो तो खरा कर्णधार; अजिंक्य रहाणेनं पुन्हा मनं जिंकली!

India vs Australia, 2nd Test : चुकला तरी सांभाळून घेतो तो खरा कर्णधार; अजिंक्य रहाणेनं पुन्हा मनं जिंकली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane) फटकेबाजी पाहण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून टिव्हीसमोर बसलेल्यांची निराशा झाली. कॅप्टन्स इनिंग शतकानंतर अजिंक्य आणखी मोठी खेळी करून टीम इंडियाला मजबूत आघाडी मिळवून देण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरला होता, परंतु दुर्दैवानं तो बाद झाला. त्याच्या सुंदर खेळीचा असा शेवट होईल, याची कल्पनाच कुणी केली नव्हती. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja)नं अर्धशतकी धावेसाठी घाई केली आणि अजिंक्यला विकेट गमवावी लागली. त्यानंतर अजिंक्यनं जे केलं, ते कौतुकास्पद होतं.

७ बाद २७७ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. अजिंक्यनं १०४ धावांवरून पुढे खेळ करताना मोठ्या खेळीची आस दाखवली. त्याच्यात तो आत्मविश्वासही दिसत होता. पण. १०० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याला माघारी जावं लागलं. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर जडेजानं शॉर्ट कव्हरला फटका मारला आणि अर्धशतकीय धावेसाठी अजिंक्यला कॉल दिला. अजिंक्यनेही त्वरीत प्रतिसाद देताना धाव घेतली, पण मार्नस लाबुशेननं चेंडू यष्टिरक्षक टीम पेनकडे दिला. थोडक्यात अजिंक्य धावबाद झाला. आपण घाई केली, हे जडेजाला कळून चुकले आणि त्यानं मान खाली घातली. पण, पॅव्हेलियनमध्ये जाता जाता अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला प्रोत्साहन दिले. 

अजिंक्यच्या या कृतीनं पुन्हा एकदा त्याच्यातला खरा कर्णधार अनुभवायला मिळाला. अजिंक्य २२३ चेंडूंत १२ चौकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. अजिंक्यनंतर मिचेल स्टार्कनं जडेजाला बाद केले. जडेजानं ५७ धावा केल्या.भारतानं ११२ षटकांत ७ बाद ३२१ धावा करून १२६ धावांची आघाडी घेतली आहे. कसोटी कारकिर्दीत अजिंक्य प्रथमच धावबाद झाला आहे. 





Web Title: Nice gesture from Ajinkya Rahane, he was encouraging Ravindra Jadeja after the mistake which lead to runout of the captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.