IPL 2022, Nicholas Pooran : प्रितीच्या संघात बिघडलेला फॉर्म Kaviya Maranच्या संघात येताच परतला; १६ चेंडूंत ८४ धावांचा पाऊस पाडला, Video

IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad) १०.७५ कोटी बोली लावलेला खेळाडू भन्नाट फॉर्मात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 09:52 AM2022-03-02T09:52:59+5:302022-03-02T09:54:54+5:30

whatsapp join usJoin us
Nicholas Pooran smashed 101* runs from 37 balls including 6 fours and 10 sixes in the Trinidad T10 League, Leatherback Giants to a comfortable 9 wicket win  | IPL 2022, Nicholas Pooran : प्रितीच्या संघात बिघडलेला फॉर्म Kaviya Maranच्या संघात येताच परतला; १६ चेंडूंत ८४ धावांचा पाऊस पाडला, Video

IPL 2022, Nicholas Pooran : प्रितीच्या संघात बिघडलेला फॉर्म Kaviya Maranच्या संघात येताच परतला; १६ चेंडूंत ८४ धावांचा पाऊस पाडला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad) १०.७५ कोटी बोली लावलेला खेळाडू भन्नाट फॉर्मात आहे. आयपीएलच्या मागच्या पर्वात हा फलंदाज प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्स ( PBKS) खेळला, परंतु त्याला ११ सामन्यांत ८५ धावा करता आल्या होत्या आणि त्यानंतर झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याने २०.६०च्या सरासरीने केवळ १०३ धावा केल्या. त्यामुळे जेव्हा SRHची मालकिण काव्या मारन ( Kaviya Maran) हिने या खेळाडूसाठी १०.७५ कोटी मोजले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. पण,  तिचा हा निर्णय योग्य असल्याचे दिसतेय. SRHने बोली लावलेल्या या खेळाडूने मंगळवारी ३७ चेंडूंत शतकी खेळी केली

SRHच्या नव्या खेळाडूचे नाव निकोलस पूरन ( Nicholas Pooran) असे आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेत निकोलसची बॅट चांगलीच तळपली. वन डे मालिकेत त्याने २०.३३च्या सरासरीने ६१ धावा केल्या असल्या तरी ट्वेंटी-२०त त्याने क्लास दाखवला. भारताविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम पूरनने ( १८४) स्वतःच्या नावावर केला आहे. त्याने न्यूझीलंडचा कॉलिन मुन्रो ( १७८ धावा, २०२०) आणि इंग्लंडचा जोस बटलर ( १७२ धावा, २०२१) यांचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे मुन्रो व बटलर यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत या धावा केल्या.

३७ चेंडूंत नाबाद १०१ धावा
Trinidad T10 Blast 2022  स्पर्धेत स्कॅर्लेट आयबीस स्कॉचर्स व लिदरबॅक जायंट्स यांच्यातल्या सामन्यात पूरनने एकहाती बाजी मारली. स्कॉचर्सने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ३ बाद १२८ धावा केल्या. टिऑन बेवस्टरने २६ चेंडूंत ५४ धावा, एवर्ट निकोल्सनने १६ चेंडूंत ४२ धावा आणि कायरॉन पोलार्डने १४ चेंडूंत २७ धावा केल्या. प्रत्युत्तरात निकोलसने ३७ चेंडूंत नाबाद १०१ धावा करताना जायंट्स संघांना एकहाती विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीत १० षटकात व ६  चौकारांची आतषबाजी झाली. कामिल पूरनने नाबाद २० धावा केल्या. जायंट्सने ९ विकेट्स व ९ चेंडू राखून हा सामना सहज जिंकला.

Web Title: Nicholas Pooran smashed 101* runs from 37 balls including 6 fours and 10 sixes in the Trinidad T10 League, Leatherback Giants to a comfortable 9 wicket win 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.