दिनेश कार्तिकने विजयी षटकाराचे श्रेय दिले धोनीला

शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या असताना कार्तिकने सौम्य सरकारच्या चेंडूवर षटकार ठोकत सनसनाटी विजय  मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 11:24 AM2018-03-20T11:24:19+5:302018-03-20T11:24:19+5:30

whatsapp join usJoin us
Nidahas Trophy 2018 ; Dinesh Karthik gave credit to the winning six | दिनेश कार्तिकने विजयी षटकाराचे श्रेय दिले धोनीला

दिनेश कार्तिकने विजयी षटकाराचे श्रेय दिले धोनीला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो - रविवारी झालेल्या आंतिम सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत निदाहास चषकावर नाव कोरलं. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात दिनेश कार्तिकने आठ चेंडूत 29 धावा पटकावत विजयात मौलाची भूमिका पार पाडली. शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या असताना कार्तिकने सौम्य सरकारच्या चेंडूवर षटकार ठोकत सनसनाटी विजय  मिळवून दिला. कार्तिकच्या या फटकेबाजीमुळं सध्या सोशल मीडियासह तो क्रिडाविश्वात चर्चेचा विषय बनला आहे. सामन्यानंतर दिनेश कार्तिकने या विजयी षटकाराचे श्रेय एमएस धोनीला  दिले आहे.

बांगलादेशविरुद्ध विजयाचा शिल्पकार दिनेश कार्तिक सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना  म्हणाला , अखेरच्या चेंडूवर मारलेला षटकार माझ्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण ठरला. शांत राहणे हे महत्त्वाचे आहे. माझ्यामते ही गोष्ट मला अनुभवातून आली. आपण ती कधीही विकत घेऊ शकत नाही किंवा वर्षभरात शिकू शकत नाही. त्यातील महेंद्रसिंग धोनी हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. सामन्याचा शेवट हे सुद्धा मी धोनीकडूनच शिकलो असे कार्तिक म्हणाला. 

मी मैदानात गेलो त्यावेळी स्थिती खूपच तणावपूर्वक होती सामना बांगलादेशच्या बाजूने झूकला होता. पण मी माझ्या डोक्यात विजय भारताला विजय मिळवून द्यायाचा या विचारानेच मैदानावत गेलो होतो. डोकं शात ठेवून मी खेळायचे ठरवले. दररोज नेटमध्ये षटकार मारण्याच्या प्रॅक्टीसमुळंच मला शेवटच्या चेंडूवर षटकार मारता आल्याचे कार्तिकने स्पष्ट केलं. सौम्य सरकाने टाकलेला शेवटचा चेंडूची लाईन लेंथ मी आधीच ओळखली होती. त्यानं चेंडू टाकल्यानंतर मी पूर्ण ताकदीने बॅट फिरवली. नशिबाने साथ दिली आणि चेंडू सरळ सिमारेषेच्या बाहेर फेकला गेला. 

कार्तिक फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताला विजयासाठी 12चेंडूत 34  करायच्या होत्या. आधीचच्या षटकामध्ये शंकरने चार चेंडू निर्धाव खेळल्यामुळं आणि मनिष पांडे बाद झाल्यामुळं संघावर दबाव वाढला होता. 19 व्या षटकात कार्तिकने दोन षटकारासह 22 धावा वसूल करत दबाव कमी केला होता. 

कार्तिकने यासह ऋषिकेश कानिटकर व जोगिंदर शर्मा यांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. कानिटकरने पाकविरुद्ध १९९८ मध्ये ढाका येथे इन्डिपेंडन्स कपच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून भारताला विजयी केले होते. जोगिंदरने २००७ च्या टी-२० विश्वचषकात पाक कर्णधार मिस्बाह उल हक याला बाद करीत भारताला जगज्जेते बनविले होते.

कार्तिकने जावेद मियांदादच्या आठवणींना उजाळाही दिल्या. मियांदादने शारजात भारताविरुद्ध अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून पाकला विजयी केले होते. कार्तिक बीसीसीआय म्हणाला, ‘हा अविस्मरणीय क्षण आहे. माझ्या रोमारोमात या क्षणाची आठवण आयुष्यभर राहील. माझ्या कारकीर्दीत यावर्षी अनेक चढउतार आले. स्पर्धा जिंकण्यात माझे योगदान राहिले याबद्दल स्वत:ला धन्य समजतो.’ 

Web Title: Nidahas Trophy 2018 ; Dinesh Karthik gave credit to the winning six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.