ठळक मुद्देजीवन मेंडिसच्या दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका करण्याच्या नादात राहुल हिट विकेट झाला.
कोलंबो : श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफीमध्ये भारताचा फलंदाज लोकेश राहुलला सोमवारी पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळाली. या ट्वेन्टी-20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात लोकेश राहुल मैदानात उतरला. त्याने 18 धावा केल्या. पण यावेळी त्याने जो विक्रम केला, तो राहुलला कधीही लक्षात ठेवावासा वाटणार नाही.
तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारतापुढे 153 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आश्वासक झाली नाही. आपल्या पहिल्याच सामन्यात मैदानात उतरलेल्या राहुलने 18 धावा केल्या. पण यावेळी तो बाद कसा झाला, याबाबत हा विक्रम आहे.
या सामन्यात जीवन मेंडिसच्या दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका करण्याच्या नादात राहुल हिट विकेट झाला. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून हिट विकेट होणारा राहुल हा पहिला फलंदाज ठरला आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये लाला अमरनाथ हे 1949 साली पहिल्यांदा हिट विकेट झाले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून नयन मोगिंया 1995 साली पहिल्यांदा हिट विकेट झाला होता.
भारताकडून गेल्या काही सामन्यांमध्ये हिट विकेट होण्याचा विक्रम कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. कसोटी सामन्यांमध्ये कोहली इंग्लडविरुद्ध नोव्हेंबर 2016 साली झालेल्या सामन्यात 40 धावांवर हिट विकेट झाला होता. एकदिवसीय लढतीत इंग्लंडविरुद्धच्या सप्टेंबर 2011 साली झालेल्या लढतीत कोहली 107 धावांवर हिट विकेट झाला होता.
Web Title: Nidahas Trophy 2018: His record Lokesh Rahul does not want to be remembered
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.