कोलंबो : भारतीय संघ सध्या श्रीलंकेत निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने स्थान पटकावले आहे. त्यामुळे त्यांनी विरंगुळा म्हणून हॉटेलमध्ये ' अशी ' मस्ती केली.
भारताला या स्पर्धेच्या पहिल्या लढतीत श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यानंतर त्यांनी बांगलादेशला दोनदा आणि श्रीलंकेवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी शुक्रवारी जिममध्ये काही वेळ व्यतित केला आणि त्यानंतर त्यांनी ' अशी ' मस्ती करत रीलॅक्ल होण्याचा प्रयत्न केला.
जिमनंतर भारतीय संघातील काही खेळाडूंनी स्वीमिंग पूल गाठले. यामध्ये सुरेश रैना, लोकेश राहुल, वॉशिंग्टम सुंदर, रीषभ पंत आणि विजय शंकर यांचा समावेश होता. जिमनंतर विरंगुळा मिळण्यासाठी त्यांनी स्वीमिंग पूल गाठले. त्यानंतर स्वीमिंग पूल त्यांनी जवळपास तासभर मस्ती केली.
याबाबत राहुल म्हणाला की, " कामगिरीचे दडपण साऱ्यांवरच असते. मैदानात दमदार कामगिरी करून संघांच्या विजयात वाटा उचलण्यासाठी प्रत्येक खेळाडू आसूसलेला असतो. त्यासाठी आम्ही नेट्समध्ये सराव करतो. जिममध्ये व्यायाम करतो. रणनितीही आखत असतो. पण या साऱ्यामध्ये खेळाडूंना विरंगुळाही हवा असतो. त्यासाठी आम्ही जिमनंतर काही काळ स्वीमिंग पूलमध्ये घालवला आणि दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला. "