कोलंबो : श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धेत भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने फलंदाजांना यष्टीचीत करण्याची पन्नाशी गाठली आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 50 फलंदाजांना यष्टीचीत करणारा कार्तिक हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चौथा यष्टीरक्षक ठरला आहे.
भारताने बुधवारी बांगलादेशवर 17 धावांनी मात केली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, सुरेश रैना किंवा वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार कामगिरी केली. या साऱ्यांचे कौतुकही झाले, पण या सामन्यात आगळे वेगळे अर्धशतक साजरे करणाऱ्या कार्तिककडे मात्र काही जणांची नजर गेली नाही.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कार्तिकने आपल्या ट्वेन्टी-20 कारकिर्दीत 50व्या फलंदाजाला यष्टीचीत केले. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर कार्तिकने बांगलादेशचा फलंदाज लिटॉन दासला यष्टीचीत करत या जादुई आकड्याला गवसणी घातली.
ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील सर्वात जास्त स्टंम्पिंग करणारे हे अव्वल चार यष्टीरक्षक
1. कामरान अकमल (पाकिस्तान) - 92.
2. महेंद्रसिगं धोनी (भारत) - 70.
3. कुमार संगकारा (श्रीलंका) - 60.
4. दिनेश कार्तिक (भारत) - 50.