कोलोंबो : श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात दिनेश कार्तिकने मोक्याच्या क्षणी केलेल्या तुफीनी फलंदाजीच्या बळावर भारताने निदाहास चषकावर नाव कोरलं आहे. कोलंबो येथे झालेल्या आंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा चार गडी राखून पराभव केला. बांगलादेशनं दिलेले 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर विजयाकडे कूच केली होती. मात्र मोक्याच्या क्षणी रोहित बाद झाला आणि सामना रंगतदार अवस्थेत गेला. रोहित पाठोपाठ मनिष पांडेही बाद झाला. नवख्या विजय शंकरला दबावात फलंदाजी करताना अडचण येत होती. पण कार्तिकने त्याच्यावरील दडपण कमी करत ते बांगलादेशच्या गोलंदाजावर घालवले. कार्तिकने आठ चेंडूत 29 धावा केल्या. या खेळीदरम्यान कार्किकने तीन षटकार आणि दोन चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला.
बांग्लादेशनं भारतापुढे विजयासाठी दिलेल्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर विजयाकडे कूच केली आहे. रोहित शर्मानं 42 चेंडूत संयमी 56 धावा केल्या.
नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शब्बीर रहमाने (७७) याने झळकावलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने झुंजार फलंदाजी करत बलाढ्य भारताला तिरंगी टी२० मालिकेच्या अंतिम सामन्यात १६७ धावांचे आव्हान दिले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये रहमाने खंबीरपणे उभे राहत ५० चेंडूत ७ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करत ७७ धावांची दमदार खेळी केली. याजोरावर बांगलादेशने ८ बाद १६६ धावांची समाधानकारक मजल मारली. फिरकीपटू युझवेंद्र चहलने ३ बळी घेत चांगला मारा केला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून भारताने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत बांगलादेशला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. बांगलादेशने आक्रमक सुरुवात करत आपला इरादा स्पष्ट केला. मात्र, युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी झटपट बळी घेत बांगलादेशची ११व्या षटकात ४ बाद ६८ अशी अवस्था करुन भारताला पकड मिळवून दिली. मात्र, एका बाजूने तग धरुन राहिलेल्या शब्बीरने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत दमदार फटकेबाजीस सुरुवात केली. शब्बीरने अनुभवी आणि गतसामन्यातील श्रीलंकेविरुद्ध हीरो ठरलेल्या महमुदुल्लाह (२१) याच्यासह संघाला सावरले. महमुदुल्लाह धावबाद झाल्यानंतर ठराविक अंतराने बळी घेत भारताने बांगलादेशला मर्यादित धावसंख्येत रोखले. जयदेव उनाडकटने शब्बीरला त्रिफळाचीत करत बांगलादेशच्या धावसंख्येला ब्रेक मारला. अखेरच्या क्षणांमध्ये मेहदी हसन याने ७ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह नाबाद १९ धावांचा तडाखा दिल्याने बांगलादेशला दिडशेचा पल्ला पार करण्यात यश आले. भारताकडून चहलने टिच्चून मारा करताना ४ षटकात १८ धावा देत ३ बळी मिळवले. उनाडकटने ३३ धावांमध्ये २ फलंदाज बाद केले, तर सुंदरने एक बळी मिळवला. बांगलादेश : तमिम इक्बाल झे. शार्दुल गो. चहल १५, लिटॉन दास झे. रैना गो. सुंदर ११, शब्बीर रहमान त्रि. गो. उनाडकट ७७, सौम्य सरकार झे. धवन गो. चहल १, मुशफिकूर रहिम झे. शंकर गो. चहल ९, महमुदुल्लाह धावबाद (कार्तिक - शंकर) २१, शाकिब अल हसन धावबाद (राहुल - शंकर) ७, मेहदी हसन नाबाद १९, रुबेल हुस्सेन त्रि. गो. उनाडकट ०, मुस्तफीझूर रहमान नाबाद ०. अवांतर - ६. एकूण : २० षटकात ८ बाद १६६ धावा. गोलंदाजी : जयदेव उनाडकट ४-०-३३-२; वॉशिंग्टन सुंदर ४-०-२०-१; युझवेंद्र चहल ४-०-१८-३; शार्दुल ठाकूर ४-०-४५-०; विजय शंकर ४-०-४८-०.