एका सामन्यात फक्त 9 चेंडूंमध्ये सहा विकेट्स गेल्याचे तुम्ही आतापर्यंत कधी पाहिले नसेल, पण ही गोष्ट घडली आहे. क्रिकेटच्या मैदानातील ही अविश्वसनीय अशीच गोष्ट आहे. कारण 9 चेंडूंमध्ये पाच धावांच्या मोबदल्यात सहा विकेट्स आतापर्यंत कधीही गेल्या नसतील.
ही गोष्ट घडली ती ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत. सामना रंगला होता तो आयर्लंड आणि युएई यांच्यामध्ये. या सामन्यात युएईने नाणेफेक जिंकली आणि आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी आयर्लंडला प्रथम फलंदाजी करताना 125 धावा करता आल्या.
आयर्लंडच्या संघाची चांगली सुरुवात झाली नव्हती. आयर्लंडचे 68 धावांत 4 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर आयर्लंडच्या पॉल स्ट्राँगने 58 चेंडूंमध्ये 9 चौकारांच्या जोरावर 72 धावांची खेळी साकारली. पॉल आयर्लंडच्या 120 धावा असताना बाद झाला. पॉल बाद झाल्यावर फक्त नऊ चेंडूंमध्ये आयर्लंडला पाच धावा करता आल्या, पण त्यांना पॉलसह सहा फलंदाज गमवावे लागले. पॉल बाद झाल्यावर आयर्लंडचे ग्रेथ डेन्ली (2), मार्क एडर (13), जॉर्ज डॉकरेल (1), डेविड डेन्ली (0) आणि बॉयड रैंकिन (1) हे फलंदाज बाद झाले.