Join us

VIDEO: 'रोहित शर्माला Mumbai Indiansचं कॅप्टन करा', चाहत्याच्या मागणीवर नीता अंबानी म्हणाल्या...

Rohit Sharma Nita Ambani Mumbai Indians Captaincy IPL 2025 viral video: शिर्डीला साईबाबांच्या दर्शनानंतर बाहेर येताना घडला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 11:49 IST

Open in App

Rohit Sharma Nita Ambani Mumbai Indians Captaincy IPL 2025 viral video: मुंबई इंडियन्सच्या संघाने रविवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला. १९व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूवर तीन रनआऊट करत मुंबई इंडियन्सने १२ धावांनी विजय मिळवला. तिलक वर्माच्या ५९ धावांच्या बळावर मुंबईने २०५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना करूण नायरने ८९ धावांची दमदार खेळी केली, पण दिल्लीला केवळ १९३ धावाच करता आल्या. मोक्याच्या क्षणी झटपट बळी गमावल्याने दिल्लीला हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सने ५ पैकी ४ सामने हरले होते. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर टीका करण्यात येत होती. तशातच एका चाहत्याने थेट संघमालकीण नीता अंबानी यांच्याकडे रोहितला कर्णधार करा अशी मागणी केली. त्यावर नीता अंबानी यांनी मजेशीर उत्तर दिले.

चाहत्याची मागणी, नीता अंबानी यांचे उत्तर

मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी साई मंदिरात साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दाखल झाल्या होत्या. शिर्डीतील साई मंदिरात नीता अंबानी त्यांच्या मातोश्रींसोबत आल्या होत्या. या मंदिर परिसरातून बाहेर जात असताना एका चाहत्याने नीता अंबानीकडे खास विनंती केली. यांना हात जोडून विनंती करत मोठी मागणी केली. रोहित शर्माला संघाचा कॅप्टन करा, अशी ती मागणी होती. यावेळी नीता अंबानी यांनी त्या चाहत्याला छान उत्तर दिले. त्या फक्त म्हणाल्या, 'बाबा की मर्जी'. म्हणजेच साईबाबांच्या मर्जीनुसार सगळं कुशल मंगल होईल, असे त्यांना सुचवायचे होते. पाहा व्हिडीओ-

मुंबई-दिल्ली सामन्यापूर्वी नीता अंबानी यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. साई मंदिरातून बाहेर पडताना हा किस्सा घडला. गेल्या वर्षीही आयपीएल सुरु असताना देखील नीता अंबानी शिर्डीतील साई मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. तसेच यावेळीही त्यांनी हजेरी लावली.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रोहित शर्मामुंबई इंडियन्सनीता अंबानीव्हायरल व्हिडिओ