भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत टीम इंडियाच्या पदरी निराशा पडली असली तरी काही चांगल्या गोष्टीही घडल्या. जसप्रीत बुमराहची विक्रमी कामगिरी अन् युवा ऑलराउंडर नितीशकुमार रेड्डीच्या रुपात टीम इंडियाला नवा स्टार मिळाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाकडून पदार्पण करताना नितीशकुमार रेड्डीनं खास छाप सोडली. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीला अल्प अन् उपयुक्त खेळीसह लक्षवेधून घेणाऱ्या नितीशकुमार रेड्डीनं पहिल्या वहिल्या मालिकेत शतकही झळकावले. या सेंच्युरीनंतर तो आता सुपरस्टारच झालाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्यसरकारकडून युवा क्रिकेटला मिळालं लाखो रुपयांचे बक्षीस
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी परतल्यावर नितीशकुमार रेड्डी सातत्याने चर्चेत आहे. मायदेशात परतल्यावर २१ वर्षीय क्रिकेटरचं धमाक्यात स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर या क्रिकेटरनं तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन देवदर्शन केल्याचा व्हिडिओही चर्चेत आला होता. या क्रिकेटरनं गुडघे टेकत मंदिराच्या पायऱ्या चढल्याचे पाहायला मिळाले होते. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा सन्मान केला आहे. त्याला राज्य सरकारकडून लोखा रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेअर केले क्रिकेटरसोबतचे फोटो
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दमदार कामगिरीनंतर आंद्र प्रदेश सरकारने टीम इंडियाच्या युवा क्रिकेटला बक्षीस जाहीर केले होते. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या सरकारनं दिलेला शब्द पाळला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटरला २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरुन क्रिकेटर आणि त्याचे वडील यांच्यासोबतचे खास फोटोही शेअर केले आहेत.
चंद्राबाबू नायडूंनी क्रिकेटरचं या शब्दांत केलं कौतुक
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू याने एक्स अकाउंटवरुन नितीशकुमार रेड्डीसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. यासाबोत त्यांनी खास शब्दांत युवा क्रिकेटरचं कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलय की, " प्रतिभावंत क्रिकेटर नितीशकुमार रेड्डीची भेट घेतली. नितीश तेलुगू समाजातील चमकता तारा आहे. तो जागतिक स्तरावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना दिसतोय. येत्या काळात तो आणखी शतके झळकावे, अशी आशा करतो."