अॅडिलेड येथील ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया संघानं तिसऱ्या दिवशीच भारतीय संघाला १० विकेट्स राखून शह दिला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारतीय संघाने धावफलकावर फक्त १८० धावा लावल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियन संघाने ट्रॅविस हेडचं दमदार शतक आणि मार्कस लाबुशेन याच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ३३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावातही भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली. १७५ धावांत संघ गारद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त १९ धावांचे आव्हान मिळाले. ते त्यांनी २० चेंडूत १० विकेट्स राखून पार केले.
ज्या सामन्यात भारतीय संघाच्या बॅटिंगमध्ये फ्लोप शो दिसला तिथं एक हिरो चमकला. त्याचं नाव आहे नितीशकुमार रेड्डी. २१ वर्षीय पोरानं दोन्ही डावात भारताकडून सर्वोच्च धावसंख्या केली. त्याला दोन्ही डावात अर्धशतकानं हुलकावणी दिली. पण त्यानं केलेल्या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाची डावानं पराभूत होण्याची नामुष्की टळली. या दमदार खेळीसह एका बाजूला नितीशकुमार रेड्डीनं खास विक्रमाला गवसणी घातली. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मावर लाजिरवाण्या विक्रमाचा ठपका पडला. एक नजर टाकुयात भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात नोंदवल्या गेलेल्या १० रेकॉर्ड्सवर
कसोटीत सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना संघाकडून सर्वोच्च धावसंख्या करणारे फलंदाज
- चंदू बोर्डे विरुद्ध इंग्लंड, कोलकाता १९६१-६२
- एमएस धोनी विरुद्ध इंग्लंड इंग्लंड एजबेस्टन २०११
- रविचंद्रन अश्विन विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स २०१८
- नितीश रेड्डी विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅडिलेड २०२४
कॅप्टन्सी करताना पॅट कमिन्सनं आठव्यांदा पाच विकेट्स हॉलचा पराक्रम नोंदवला
संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्या नावे आहे. त्यांनी १२ वेळा ही कामगिरी करून दाखवलीये. याशिवा रिची बेनाउड यांनी ९ वेळा हा पराक्रम केलाय.
डे-नाइट टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड
- ३८३ धावा -ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाक अॅडिलेड २०१९
- ३७९ धावा -ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत अॅडिलेड २०२४
- ३६९ पाकिस्तान विरुद्ध वेस्टइंडिज दुबई २०२६
- ३६२ धावा न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड माउंट माउंगानुई २०२३
डे-नाइट टेस्ट मॅचमध्ये जलद शतक
- १११ चेंडूत: ट्रेविस हेड विरुद्ध भारत अॅडिलेड २०२४
- ११२ चेंडूत: ट्रेविस हेड विरुद्ध इंग्लंड होबार्ट २०२२
- १२५ चेंडूत: ट्रेविस हेड विरुद्ध वेस्टइंडिज अॅडिलेड २०२२
- १३९ चेंडूत : जो रूट विरुद्ध वेस्टइंडिज एजबेस्टन २०१७
- १४० चेंडूत :असद शफीक विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन २०१६
डे-नाइट टेस्टमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड
- ४ मार्नस लाबुशेन
- ३ ट्रॅविस हेड
- २ असद शफीक आणि दिमुथ करुणारत्ने
एका कॅलेंडर इयरमध्ये ५०+ विकेट घेणारा भारतीय गोलंदाज
- ७४ कपिल देव (१९७९)
- ७५ कपिल देव (१९८३)
- ५१ झहीर खान (२००२)
- ५० जसप्रीत बुमराह (२०२४) *
टेस्टमधील मिचेल स्टार्कची सर्वोत्तम कामगिरी
- ६/४८ विरुद्ध भारत अॅडिलेड २०२४
- ६/५० विरुद्ध श्रीलंका गॉल 2016
- ६/६६ विरुद्ध पाकिस्तान अॅडिलेड २०१९
- ६/१११ विरुद्ध इंग्लंड नॉटिंघम २०१५
- ६/१५४ विरुद्ध एसए पर्थ WACA २०१२
सलग पराभवाच्या मालिकेचा सामना करणारे भारतीय कर्णधार
- ६ एमएके पतौडी (१९६७-६८)
- ५ सचिन तेंडुलकर (१९९९ ते २०००)
- ४ दत्ता गायकवाड (१९५९)
- ४ एमएस धोनी (२०११)
- ४ एमएस धोनी (२०१४)
- ४ विराट कोहली (२०२०-२१)
- ४ रोहित शर्मा (२०२४) *
ऑस्ट्रेलियात सर्वात कमी चेंडूत संपलेले कसोटी सामने
- ६५६ ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका मेलबर्न १९३२
- ८६६ ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका ब्रिसबेन २०२२
- ९११ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सिडनी १८९५
- १०३१ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅडिलेड २०२४
- १०३४ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ब्रिसबेन १९५०
ऑस्ट्रेलियव संघाचा डे नाइट टेस्ट सामन्यातील रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियन संघानं आतापर्यंत १३ डे नाइट टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. यात १२ सामन्यात त्यांनी विजय नोंदवला आहे. एकमेव सामना त्यांनी गमावला आहे.