Join us

कर्णधारपद काढून घेतले म्हणून झाला नाराज; नितिश राणा दुसऱ्या संघाकडून खेळणार

इंडियन प्रीमिअर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा नितिश राणा नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 18:27 IST

Open in App

दिल्ली संघाचा माजी कर्णधार ध्रुव शौरे आणि नितीश राणा यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) कडे NOC मागितली आहे. आगामी मोसमात हे खेळाडू दिल्लीकडून खेळू इच्छित नाही. त्यांनी DDCAकडे औपचारिकपणे याची मागणी केली आहे, तरीही असोसिएशनने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

दिल्लीकडून खेळताना नितीश राणा आणि ध्रुव शौरी यांची कारकीर्द ज्या दिशेनं जात होती, त्या दिशेने दोन्ही क्रिकेटपटू नाराज होते. या संघासोबत पुढे जाण्याचा त्यांचा इरादा नसल्याचे त्यांनी औपचारिकपणे स्पष्ट केला होता. गेल्या देशांतर्गत हंगामाच्या समाप्तीपासून तो इतर पर्यायांच्या शोधात होते. नितीश राणाने जानेवारीत झालेल्या रणजी स्पर्धेत मुंबईविरुद्ध ११ आणि ६ धावा केल्या होत्या. शेड्युलमधील शेवटचा सामना हैदराबादविरुद्ध होता, मात्र नितीशने त्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आणि आपले नाव मागे घेतले.

एका सूत्राने न्यूज18 ला सांगितले की, “नितीश राणा गेल्या हंगामापासून बदलीच्या शोधात होता. गेल्या मोसमात राणाला ज्या पद्धतीने कर्णधारपदावरून वगळण्यात आले त्यामुळे तो नाराज झाला होता. मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी तो परतला पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला वगळण्यात आले. महाराष्ट्राविरुद्ध १४ व ४० आणि आसामविरुद्ध शून्य धावा केल्यानंतर. तो तामिळनाडू, सौराष्ट्र आणि आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळला नाही.

ध्रुव शौरीबद्दल सांगायचे तर तो मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे. पण लाल चेंडूंच्या फॉरमॅटमध्ये तो महत्त्वाचा खेळाडू बनला आहे, त्यामुळे त्याच्या पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळण्याची शक्यता कमी होत आहे. सूत्राने सांगितले की, “तो दिल्लीसाठी रेड बॉल क्रिकेट खेळतो, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याला न मिळणाऱ्या संधींमुळे तो खूश नव्हता. तरीही त्याला मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळायचे आहे.''

DDCA ने नुकतीच बुची बाबू स्पर्धेसाठी संघ निवडला आणि नितीश राणा व ध्रुव शौरी यांचे नाव त्यात आहे.  मात्र संघ स्पर्धेसाठी रवाना होण्याच्या एक दिवस आधी दोघांनी डीडीसीएकडे एनओसीची मागणी केली.

टॅग्स :दिल्लीकोलकाता नाईट रायडर्स
Open in App