Join us  

भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिका होणार का? गांगुली म्हणतो...

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली येत्या 23 ऑक्टोबरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र अधिकृतरित्या हाती घेणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:34 AM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली येत्या 23 ऑक्टोबरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्र अधिकृतरित्या हाती घेणार आहे. त्यानंतर 24 ऑक्टोबरला तो नवनिर्वाचित सदस्यांसोबत बैठकही घेणार आहे. गांगुली अध्यक्ष झाल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील अशी सर्वांना अपेक्षा आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील क्रिकेट मालिका.... दोन्ही देशांमधील तणावजन्य परिस्थिती पाहता गेल्या अनेक वर्षांपासून उभय संघांत द्विदेशीय क्रिकेट मालिका झालेली नाही. पण, भविष्यात होणारच नाही, असे नाही. त्यामुळे गांगुली त्या दृष्टीनं पाऊल उचलेल, असं अनेकांना वाटते.

कोलकाता येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत गांगुलीनं सांगितले की,''भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय क्रिकेट मालिकेचा निर्णय हा दोन्ही देशांचे पंतप्रधान घेतील. त्यामुळे या मालिकेबद्दल तुम्ही नरेंद्र मोदीजी आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना विचारा. ही आंतरराष्ट्रीय मालिका असल्यामुळे सरकारची परवानगी घेणे गरजेचे असते. त्यामुळे आता या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नाही.'' 

2004च्या ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यात गांगुलीनं टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले होते.  1999च्या कारगील युद्धानंतरची ती पहिलीच द्विदेशीय मालिका होती. भारतानं 1989मध्ये पहिल्यांदा पाक दौरा केला होता. 2012नंतर दोन्ही देशांमध्ये द्विदेशीय मालिका झालेली नाही.   

महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याचा निर्णय 'दादा'च्या कचेरीत; या दिवशी फैसलामाजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून धोनीनं विश्रांती घेणं पसंत केलं. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, परंतु माहीनं त्याबाबत अद्याप स्पष्ट मत मांडलेले नाही. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांनीही निवृत्तीचा निर्णय धोनी स्वतः घेईल असे, मत व्यक्त केले आहे. पण, आता गांगुलीच्या अक्ष्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्याच बैठकीत धोनीच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया मायदेशात बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामने होतील. गांगुली म्हणाला,''24 तारखेला निवड समितीसोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल. निवड समितीच्या डोक्यात नेमका काय विचार आहे, ते मी जाणून घेणार आहे. त्यानंतर मी माझं मत मांडेन. धोनीनं दीर्घ विश्रांती घेतली, तेव्हा मी या पदावर नव्हतो. त्यामुळे निवड समितीसोबतच्या पहिल्या बैठकीत मला नेमकं काय ते कळेल. धोनीला काय हवंय हे पाहूया.''  

टॅग्स :सौरभ गांगुलीभारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआयमहेंद्रसिंग धोनी