समोर दिसतोय Run Out आहे, पण अम्पायरने दिला नॉट आऊट; ऑसी खेळाडूंचा थयथयाट

AUS vs WI 2nd T20I - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ३४ धावांनी विजयी मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:18 AM2024-02-12T09:18:26+5:302024-02-12T09:18:38+5:30

whatsapp join usJoin us
No appeal = no run out?  Bizarre scenes unfold as West Indies batter survives despite being run out during AUS vs WI 2nd T20I, Video  | समोर दिसतोय Run Out आहे, पण अम्पायरने दिला नॉट आऊट; ऑसी खेळाडूंचा थयथयाट

समोर दिसतोय Run Out आहे, पण अम्पायरने दिला नॉट आऊट; ऑसी खेळाडूंचा थयथयाट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs WI 2nd T20I - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ३४ धावांनी विजयी मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २४१ धावा केल्या आणि विंडीजनेही ९ बाद २०७ धावांपर्यंत जोर लावला होता. या सामन्यात विंडीजच्या डावातील १९व्या षटकात घडलेल्या एका विचित्र प्रकाराने सर्वत्र चर्चा सुरू आहे. समोर दिसतोय विंडीजचा फलंदाज रन आऊट आहे, परंतु अम्पायरने त्याला नॉट आऊट दिले आणि त्यांनी दिलेले कारण ऐकून ऑसी खेळाडू संतापले...

ऑस्ट्रेलिया पुन्हा...! टीम इंडियाला हरवले अन् वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले


प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. जॉश इंग्लिस ( ४), डेव्हिड वॉर्नर ( २२) व कर्णधार मिचेल मार्श ( २९) हे झटपट माघारी परतले. पण, ग्लेन मॅक्सवेल खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याने ५५ चेंडूंत १२ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने नाबाद १२० धावांची विक्रमी खेळी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील हे त्याचे पाचवे शतक ठरले आणि त्याने रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली. टीम डेव्हिडने १४ चेंडूंत ३१ धावांचा हातभार लावल्याने ऑस्ट्रेलिया ४ बाद २४१ धावांपर्यंत पोहोचले.


प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचे ब्रेंडन किंग ( ५), जॉन्सन चार्ल्स ( २४), निकोलस पूरन ( १८), शे होप ( ०) व शेर्फाने रुथरफोर्ड ( ०) हे पाच फलंदाज ६३ धावांवर माघारी परतले. कर्णधार रोवमन पॉवेलने ३६ चेंडूंत ६३ धावांची वादळी खेळी केली. आंद्रे रसेलने १६ चेंडूंत ३७ धावा कुटल्या, तर जेसन होल्डर २८ धावांवर नाबाद राहिला. डावातील १९व्या षटकात अल्झारी जोसेफ रन आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विजयी सेलिब्रेशन सुरू केलं. पण, अम्पायरने जोसेफला थांबवून घेतले, त्यांनी वॉकीटॉकीवर तिसऱ्या अम्पायरशी काहीतरी चर्चा केली आणि जोसेफला नाबाद दिले. 


हा प्रकार पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू रिडिक्युलस म्हणताना ऐकू येत आहेत.. ते संतापलेले होते. पण, जेव्हा जोसेफला रन आऊट केलं गेलं तेव्हा एकानेही अपील केले नाही आणि त्याच कारणामुळे अम्पायरने फलंदाजाला नाबाद दिले..

Web Title: No appeal = no run out?  Bizarre scenes unfold as West Indies batter survives despite being run out during AUS vs WI 2nd T20I, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.