Ban Umpire, No Ball Controversy IPL 2022 DC vs RR: शुक्रवारी रात्री IPL च्या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. दिल्लीच्या संघाला शेवटच्या षटकात ३६ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी पहिले दोन चेंडू रॉवमन पॉवेलने षटकार मारले. तिसरा चेंडू कमरेच्या वर फुलटॉस आला, तो देखील त्याने षटकार लगावला. तो चेंडू नो बॉल असून देखील पंचांनी निर्णय दिला नाही. मैदानावरील पंचांशी वाद घातल्याने दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंत आणि शार्दूल ठाकूर यांच्यावर IPL कडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोचिंग स्टाफमधील प्रवीण अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली. पण, चुकीच्या वर्तणुकीची शिक्षा जशी खेळाडूंना देण्यात आली, तसेच चुकीचे निर्णय दिल्याबद्दल पंचांवर कारवाई का नाही? असा संतप्त सवाल सोशल नेटकऱ्यांनी केला. तसेच, नितीन मेनन या पंचांना IPL मधून बॅन करावे अशी मागणीही करण्यात आली.
--
--
--
--
--
--
--
सुमार दर्जाच्या पंचगिरीचा फटका संघांना बसणे किंवा चुकीच्या निर्णयामुळे वाद निर्माण होणे, याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीच्या हंगामात अनेकदा पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका अनेकांना बसला आहे. तसेच यंदाच्या हंगामातही काही वेळा पंचांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. विराट कोहलीचा मुंबई इंडियन्स विरूद्धचा LBW चा DRS, मार्कस स्टॉयनीसच्या वेळी वाईड न दिल्याने झालेला परिणाम असे अनेक चुकीचे निर्णय सामना फिरण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २२२ धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरने ६५ चेंडूत ११६ धावांची खेळी केली. देवदत्त प़ड़िकलने देखील अर्धशतक झळकावले. तर संजू सॅमसनने १९ चेंडूत नाबाद ४६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात रिषभ पंतने २४ चेंडूत ४४ धावा केल्या. ललित यादवने ३७ धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉ ने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. शेवटच्या षटकात रॉवमन पॉवेलने तीन षटकार लगावत सामन्यात रंगत आणली होती. पण अखेर दिल्ली पराभूत व्हावे लागले.