- सुनील गावस्कर लिहितात...
वाँडरर्समध्ये पिंक डेच्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाचे नशीब बदलले त्यामुळे या संघाला प्रत्येक लढत पिंक टीशर्टमध्ये खेळावी असेच वाटत असेल. गुलाबी टीशर्टमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने आजतागायत एकही लढत गमावलेली नाही. वाँडरर्समध्ये त्यांनी वरुणदेवतेचे आभार मानायला हवे. कारण डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार षटकांच्या संख्येत कपात करण्यात आली. याव्यतिरिक्त झेलही टिपता आले नाही आणि फलंदाज बाद झाला तो नोबॉल होता. दोन्ही वेळी सुदैवी ठरलेला फलंदाज डेव्हिड मिलर होता. त्याने काही शानदार फटके मारत लढतीचे पारडे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकवले. केवळ दुसरा सामना खेळणाºया हेन्रिक क्लासनने जोखिम पत्करली आणि त्याने फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. भारतीय संघाचा प्रथम फलंदाजी स्वीकारण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले. भारतीय संघ व्यवस्थापनाला लढतीदरम्यान पावसाची शक्यता असल्याची कल्पना होती, पण कोहली व धवन यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावरून याची प्रचिती आली. डकवर्थ-लुईस नियम हा लक्ष्याचा पाठलाग करणाºया संघासाठी लाभदायक असल्याची सर्वांना कल्पना आहे आणि तेच घडले. कोहली व धवन यांच्या शानदार खेळीनंतरही भारताला तीनशेचा आकडा पार करता आला नाही. प्रथम फलंदाजी करणाºया संघासाठी कुठली धावसंख्या योग्य ठरेल, याची कल्पना नसते. धावगती वाढविण्याच्या प्रयत्नात कोहली बाद झाला. आणखी एक शतक झळकावण्याची संधी त्याने गमावली. मात्र यावेळी धवनने संधी गमावली नाही, पण पावसानंतर पुन्हा खेळ सुरू झाला त्यावेळी धवनची एकाग्रता भंग झाली होती. तो लवकरच बाद झाला.
सुरुवातीला भारतीय संघाने धावसंख्येचा चांगला बचाव केला. त्यामुळे विजयाची शक्यता दिसत होती, पण एबी डिव्हिलियर्सचे पुनरागमन दक्षिण आफ्रिका संघासाठी ‘टॉनिक’प्रमाणे ठरले. त्यानंतर चहलचा तो ‘नो-बॉल’ दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयात महत्त्वाचा ठरला. नोबॉलवर सुदैवी ठरल्यानंतर प्रतिस्पर्धी फलंदाजांना सामना जिंकून देणारी खेळी करणे, भारताबाबत दुसºयांदा घडले. आधुनिक तंत्रज्ञान असताना नो-बॉल टाकणे कुठल्याही अपराधाच्या तुलनेत कमी नाही. एका नोबॉलचा अर्थ प्रतिस्पर्धी संघाला एक अतिरिक्त धाव देण्यासोबतच पुढच्या चेंडूंवर फ्री हिटच्या माध्यमातून हवेत फटका मारण्याची सूट मिळते. चहलच्या त्या चुकीचा मिलरने चांगला लाभ घेतला. बुमराहने यापूर्वी याची किंमत मोजली आहे. त्यानंतर त्याने प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली रन-अपवर मेहनत घेत सुधारणा केली.
या पराभवाची भारतीय संघ अधिक चिंता करणार नाही. कारण यजमानांच्या विजयात त्या ‘नो-बॉल’पेक्षा मोठी भूमिका पावसाची आहे, याची त्यांना चांगली कल्पना आहे. दिग्गज संघ यापूर्वी झालेल्या चुकांपासून बोध घेत वाटचाल करण्यास प्राधान्य देतात. भारतीय संघही पोर्ट एलिझाबेथमध्ये वाँडरर्समधील चुका सुधारण्यास प्रयत्नशील राहील, अशी आशा आहे. (पीएमजी)
Web Title: No ball is less than any crime
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.