कोरोना व्हायरसमुळे जगभरात तणावाचे वातावण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 53,392 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 23,708 जणं बरी झाली असली तरी मृतांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. आतापर्यंत 1 लाख 14, 253 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षानं पुढे ढकलण्यात आल्या.
Corona रुग्णांसमोर पाकिस्तानी डॉक्टर्सचा डान्स; गौतम गंभीरनं घेतला क्लास, Video
इंडियन प्रीमिअर लीग, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया चषक स्पर्धेशिवाय क्रिकेट मालिकांवरही अनिश्चिततेचं संकट आहे. जगभरातील कोरोना व्हायरसशी सद्यस्थिती पाहता पुढील वर्षभर क्रिकेट स्पर्धा होणार नसल्याची भविष्यवाणी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं केली आहे. 44 वर्षीय अख्तर म्हणाला,''पुढील वर्षभर क्रिकेट स्पर्धा होतील असं मला वाटत नाही. माझा अंदाज मला हे सांगत आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही होणार नाही. सध्या आपण संकटजन्य परिस्थितीत आहोत.''
दरम्यान, अख्तरनं कोरोना व्हायरसाचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा व्हावा याकरिता भारत-पाकिस्तान यांच्यात तीन वन डे सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. अख्तर म्हणाला होता की,''हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव मला ठेवायचा आहे. पण, या सामन्यातून दोन्ही देशांतील चाहते एकमेकांच्या पाठिशी उभे राहतील. विराटनं शतक झळकावलं तर आम्ही आनंद साजरा करू, तसेच बाबरनं शतक झळकावल्यास तुम्ही आनंद साजरा करा. मैदानावरील निकालापेक्षा दोन्ही सघ विजयी ठरतील. या सामन्याला मोठी व्ह्यूअर्सशीप मिळेल. इतिहासात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांसाठी खेळतील. यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांना समान दिला जाईल.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!
लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस; गायीवर बलात्कार केल्याचा फुटबॉलपटूचा दावा
शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न
क्रिकेटला ब्रेक तरीही विराट कोहली टॉप; आयसीसीनं पोस्ट केली मजेशीर आकडेवारी
'अपेक्षा वि. वास्तव'; सानिया मिर्झाकडून पती शोएब मलिकाला लग्नाच्या हटके शुभेच्छा
...तर MS Dhoniची कोणत्या आधारावर टीम इंडियात निवड कराल?; गौतमचा 'गंभीर' सवाल
Web Title: 'No cricket for next one year', predicts Shoaib Akhtar amid novel Corona virus pandemic svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.