कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी आणखी 21 दिवसांनी वाढवला आहे. मोदींनी मंगळवारी घोषणा केली आणि त्यानुसार 3 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मोदींच्या या घोषणेमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आणखी गडद झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) सूत्रांनुसार आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे 29 मार्चपासून सुरू होणारी स्पर्धा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. पण, आता मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे छोट्या फॉरमॅटमध्येही ही स्पर्धा होण्याची शक्यता फार कमी आहे. ही स्पर्धा मे-जून किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबर अशी खेळवण्याची चर्चा सुरू होती. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही रद्द होण्याचा मार्गावर आहे. त्या कालावधीत आयपीएल खेळवण्याचा विचार सुरू आहे.
बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांना आयपीएलबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की,''आता चित्र स्पष्ट नाही. लॉकडाऊन कधी संपेल याची माहिती नाही. सरकारकडून आम्हाला ठोस माहिती मिळाल्यानंतर आम्ही चर्चा करू. त्यामुळे आताच भविष्यवाणी करणे चुकीचे ठरेल.''
कोरोना व्हायरसमुळे युएफा युरो चषक, टोक्या ऑलिम्पिक, एनबीए, इपीएल, सीरि ए, बुंदेसलीगा, ला लिगा आदी प्रमुख व मोठ्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान बीसीसीआयने एक मास्टर प्लान तयार केला असून चाहल्यांना IPLचा आनंद लुटता येणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''परिस्थिती सुधारल्यास आयपीएल जुलै महिन्यात किंवा हिवाळ्यात खेळवण्यात येईल. बीसीसीआय त्यावर विचार करत आहे. गरज पडल्यात रिकाम्या स्टेडियमवर म्हणजेच चाहत्यांशिवाय सामना खेळवण्याची तयारी आहे.'' आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला हजारो कोटींचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआय सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक; Corona Virus मुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू जाफर सर्फराजचा मृत्यू
भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा
युवराज सिंगला मदत केली, तेव्हा पाकिस्तानातून टीका झाली नाही; शाहिद आफ्रिदीचा भारतीयांना टोमणा
Video: बेबी, मै क्या हू तेरा? हार्दिक पांड्यानं प्रेयसी नताशाला विचारला सवाल अन्...
Video : फुकट काम करेन, फक्त पाकिस्तानातील लोकांना रेशन पुरवा; शाहिद आफ्रिदीचे आवाहन