वेलिंग्टन : लॉर्ड्सवर पदार्पणात कसोटीत दुहेरी शतक ठोकल्यानंतर न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डेव्हन कॉनवे चर्चेत आला. त्याच्याआधी अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचाच मॅथ्यू सिन्क्लेअर होता. आज त्याची दयनीय अवस्था आहे. सिन्क्लेअरकडे पोटापाण्याची सोय नाही. त्याची पत्नी टीनादेखील त्याला सोडून गेली. ३३ कसोटीत सिन्क्लेअरने १६३५ धावा केल्या.
२६ डिसेंबर १९९९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले आणि या सामन्यात दुहेरी शतक झळकावले. ५४ एकदिवसीय सामन्यात त्याच्या १३०४ धावा आहेत, त्यात २ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. निवृत्तीनंतर मॅथ्यू सिन्क्लेअरचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ‘निवृत्तीनंतर नोकरी नाही आणि कुटुंबाचे पोषण करण्यासाठी सरकारच्या बेरोजगार भत्त्यावर विसंबून आहे.
सिन्क्लेअरकडे कोणतीही पदवी नव्हती, यामुळे त्याला नोकरी मिळाली नाही. आर्थिक अडचणींमुळे सिन्क्लेअर आणि त्यांची पत्नी भांडण करू लागले. सिन्क्लेअरवरही घरगुती हिंसाचाराचा आरोप होता. त्यामुळे पत्नीला घटस्फोट दिला. सिन्क्लेअर रिअल इस्टेट कंपनीत काम करतो. येथे कमिशन आधारावर मोबदला मिळतो. पदार्पणाच्या कसोटीत दुहेरी शतक ठोकणारा खेळाडू असे जीवन जगतो, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.