Join us  

‘कसोटीत आता जागतिक दर्जाचे गोलंदाज कमीच’

‘पूर्वी कसोटी क्रिकेटविषयी जी उत्सुकता असायची, ती आता फारशी दिसत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 4:20 AM

Open in App

इंदूर : ‘पूर्वी कसोटी क्रिकेटविषयी जी उत्सुकता असायची, ती आता फारशी दिसत नाही. प्रेक्षकांना ज्या फलंदाज-गोलंदाजांमधील चुरशीची लढत बघायची असते, ती आता पाहण्यास मिळत नाही. कारण आज जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांची खूप कमतरता आहे,’ से मत दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.सत्तर आणि एेंशीच्या दशकात सुनील गावस्कर विरुद्ध अँडी रॉबर्ट्स, डेनिस लिली, इम्रान खान यांच्यात जो संघर्ष बघायला मिळत होता. त्याचप्रमाणे सचिन विरुद्ध अक्रम किंवा मॅकग्रा अशी लढतही क्रिकेटप्रेमींसाठी मेजवाणी ठरत असे. परंतु सध्या अशा लढतींचा आनंद मिळत नाही.तेंडुलकरने याविषयी सांगितले की,‘आधी क्रिकेट चाहत्यांना प्रतिस्पर्धा बघायची होती. मात्र आता ती परिस्थिती नाही. कारण आता विश्वस्तरीय गोलंदाजांची कमतरता आहे. मात्र वेगवान गोलंदाजांचा स्तर नक्कीच बदलला जाऊ शकतो.’ कसोटी खेळणाऱ्या तीनच (आॅस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड) देशांमध्ये स्पर्धा मानली जाते. मात्र ही चांगली गोष्ट नाही. मला वाटते की आपण चांगली खेळपट्टी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यामुळे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल.’ त्याचप्रमाणे, ‘जर सामन्यात त उल्यबळ लढत झाली नाही, तर खेळातील उत्सुकता कमी होईल. त्यामुळेच कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या दर्जाची खेळपट्टी असणे खूप आवश्यक आहे,’ असेही सचिनने म्हटले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :सचिन तेंडुलकर