दिल्ली उच्च न्यायालयाने ‘Jailer’ चित्रपटाच्या निर्मात्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)ची जर्सी घातलेली दृश्ये बदलण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, १ सप्टेंबरपर्यंत दृश्ये बदलणे किंवा काढून टाकणे आवश्यक आहे. कोणत्याही थिएटरमध्ये RCB ची जर्सी घातलेले ते दृश्य प्रदर्शित होणार नाही, याची काळजी निर्मात्यांना घ्यावी लागणार आहे.
“प्रतिवादी तसेच त्यांच्या वितरण नेटवर्कसह त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या वतीने कार्य करणारे सर्व पक्ष वरील अटी व शर्तींना बांधील असतील. १ सप्टेंबर २०२३ पासून, जेलर चित्रपटात RCB संघाची जर्सी घालून असलेले दृश्य संपादित/बदललेली असेल. १ सप्टेंबरनंतर कोणत्याही थिएटरमध्ये ते दृश्य प्रदर्शित होणार नाही याची प्रतिवादी खात्री करतील. दूरचित्रवाणी किंवा कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाची बदललेली आवृत्ती प्रसारित/प्रक्षेपित केली जावी," असा न्यायालयाने आदेश दिला आहे.
आयपीएल फ्रँचायझीने न्यायालयात तक्रार दाखल केली आणि "निंदनीय रीतीने" चित्रित केलेल्या दृश्यांमध्ये आरसीबी जर्सीच्या वापरावर आक्षेप घेतला. चित्रपटात एका कॉन्ट्रॅक्ट किलरने जर्सी घातली आहे आणि चित्रपटातील एका स्त्री पात्राशी गैरवर्तन केले आहे. आता RCB चा दावा आहे की चित्रपटातील जर्सीचा वापर नकारात्मक पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे आणि जर्सी वापरण्यापूर्वी संघाची परवानगी घेण्यात आली नव्हती. आरसीबीने दावा केला आहे की नकारात्मक वापर त्यांच्या ब्रँड इमेजला धोक आणण्यासाठी केला गेला आहे.
चित्रपट निर्मात्यांनी जर्सी अशा प्रकारे बदलण्यास सहमती दर्शविली आहे की, ती जर्सी म्हणून दर्शविली जाणार नाही. "यामध्ये आरसीबी जर्सीचे प्राथमिक रंग हटवणे तसेच आरसीबी जर्सीवर दिसणारे प्रायोजकांचे ब्रँडिंग इत्यादींचा समावेश असेल. जेलर हा फीचर चित्रपट १० ऑगस्ट,रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि हे लक्षात घेऊन, पक्षकारांनी हे बदल दहा दिवसांच्या आत करण्यास सहमती दर्शविली आहे. " असे त्यांनी न्यायालयाने नमूद केले.